बॅंकेत व शाळेत नोकरी मागितली नोकरी मिळाली नाही शेवटी स्वताची शाळा व दोन पतसंस्था स्थापन केल्या निजामपूरच्या लक्ष्मीकांतभाई शाह यांचा प्रेरणादायी जिवन प्रवास निजामपूर( परवेज सैय्यद) दि.१० - निजामपूरचे लक्ष्मीकांत शहा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ कोणालाही मदत करण्यासाठी नेहमी पुढे असणारे आपल्या छोट्याशा व्यवसायापासून जीवनाची सुरुवात करणारे लक्ष्मीकांत भाई गावातील शिक्षण संस्थेत नोकरी मिळावी किंवा गावातील सहकारी बँकेत नोकरी मिळावी ही भाईंची मनोकामना त्या दृष्टीने भाईंनी प्रयत्न देखील केले परंतु दोन्ही ठिकाणी नोकरी मिळाली नाही परंतु भाईंनी नोकरी करावी हे नियतीला मान्य नव्हते म्हणून आज निजामपूर- जैताणे येथे भाणुबेन वाणी पब्लिक स्कूल व अशुमती बेन शाह विद्यालय या दोन शाळा व म्हसाई माता महीला पतसंस्था व स्वामी विवेकानंद पतसंस्थेची स्थापना केली भाईंच्या या दोन्ही शाळा व दोन्ही पतसंस्था जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या आहेत लक्ष्मीकांत भाई शाह यांचे वडील वीरेंद्रलाल शाह याचा शेती सह छोटासा व्यवसाय होता भाईंनी शिक्षणानंतर वडिलोपार्जित व्यवसायात पदार्पण केले त्यात गाडीला लागणारे स्पेअर पार्ट, सुटे ऑईल, फरशी, टाइल्स, साबण, हेल्मेट, आशा वस्तू विक्रीला ठेवून व्यवसायाला सुरुवात केली धुळे नंदुरबार येथुन गॅस सिलेंडर आणून ते देखील विकले परंतु व्यवसायात जम बसत नव्हता म्हणून गावातच नातेवाईकांची शिक्षण संस्था होती तिथे नोकरी साठी प्रयत्न केले गावात सहकारी बँक होती तिथे नोकरी साठी प्रयत्न केले परंतु नोकरी मिळाली नाही असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे स्री चा हात असतो त्या प्रमाणे 1998 मध्ये लक्ष्मीकांत भाईंचे लग्न योगिता भाभीशी झाले आणि भाईंचे आयुष्यच पालटले आणि त्याला जोड मिळाली भाईंवर असलेल्या म्हसाई मातेच्या आशीर्वादाची त्याच सुमारासभाईंनी भामेर रस्त्यावर असलेल्या माळरानावरील छोट्याशा म्हसाई माता मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले व मित्र मंडळींच्या सहकार्याने त्या ठिकाणी भव्य असे चार एकर मध्ये मंदिर उभारले व तेव्हापासून म्हसाई माताच्या कृपेने भाईंची उतरोत्तर प्रगती होत गेली सुरवातीला भाईंनी लॅंड डेव्हलपमेंटच्या व्यवसायाला सुरुवात केली त्या नंतर पेट्रोल पंप, गॅस एजन्सी कन्स्ट्रक्शन आदि व्यवसायात जम बसविला व्यवसायाबरोबरच राजकारण, समाजकारण,सहकार क्षेत्रात भाई कार्यरत आहेत राजकारणात आ अमरीश भाई पटेल, माजी जि प अध्यक्ष शिवाजीराव दहीते, माजी आ राजवर्धन कदमबांडे, माजी आ डी एस अहिरे, माजी आ चंद्रकांत रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभत असते त्या मुळे तालुका वासीयांची कामे भाईंच्या हातून होत असतात म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे होत आहेत लक्ष्मीकांत भाई शाह हे संस्थापक म्हसाई माता महीला पत संस्था निजामपूर , चेअरमन स्वामी विवेकानंद पतसंस्था निजामपूर, चेअरमन धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशन धुळे,अध्यक्ष निजामपूर जैताणे ग्राम विकास प्रतिष्ठान निजामपूर, अध्यक्ष म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट निजामपूर या पदावर कार्यरत आहेत म्हसाई गृपचे भिकनलाल जयस्वाल, ललित आरूजा, अजित चंद्र शाह, वासुदेव वाणी,राजेंद्र शाह, सलीम पठाण, खुदाबक्ष शेख, युसुफ सैय्यद, बापूराव महाले, निलेश जयस्वाल, सुमंत कुमार शाह, दुल्लभ माळी, इश्वर सोनार,दिलीप पवार,सुनील सुर्यवंशी या मित्रांची भक्कम साथ भाईंना लाभत असते. अशा प्रेरणादाई जीवनात लक्ष्मीकांत शाह यांचे खंदे समर्थक असिफ सय्यद यांचा २०१५ मध्ये निधन झाले व त्यांची साथ तेथेतच थांबली.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post