कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई निजामपूर (परवेज सैय्यद) दि.३१ - निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील टिटाणे गावाचे शिवारात दिनांक २५ जानेवारी रोजी पहाटे ०२.००वाजेच्या सुमारास सुघलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे टॉवर क्रमांक V-१८ मधील ८४,०००/- रुपये किंमतीचीकॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ००१५ / २०२५ बीएनएस कलम३०५,३३१(४),३(५) प्रमाणे दि. २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचाअसल्याने सपोनी/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना केलेल्यातपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे ०१. जयेश सोनु बागुल, २) मनोहर रोहीदास बगुल दोन्ही रा. सिंदबनता.साक्री जि.धुळे, ३)शेख साबीर शेख शब्बीर पिंजारी, रा. शास्त्रीनगर नंदुरबार ता. जि.नंदुरबार ४) जितेंद्र ऊर्फजितु रंजित पवार ५) ललीत चुनीलाल चौरे दोन्ही रा. वाल्हवे ता. साक्री जि.धुळे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुनळागुन्हा करतांना वापरलेली मारुती कंपनीची रिट्स कार, हिरोहोंडा कंपनीची फॅशन मोटार सायकल व चोरीसगेलेली कॉपर केबल व इतर मुद्देमाल असा एकुण ३,८६,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुनत्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीसअधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि / श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचेमार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि / श्री मयुर भामरे, पोउनि / प्रदिप सोनवणे,पोउनि/मधुकर सोमासे, असई/रुपसिंग वळवी, पोहेकॉ /प्रशांत ठाकुर, पोहेकॉ / नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे,पोहेकॉ/नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ / प्रदिप आखाडे, पोकॉ/ सागर थाटसिंगारे, पोकॉ/ कृष्णा भिल, पोकॉ/ पृथ्वीराजशिंदे, पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/गौतम अहिरे, पोकॉ/२८४ सुनिल अहिरे यांचे पथकाने केली आहे.
byloksahi.varta.news
-
0