-->

अग्री स्टॅक -शेतकरी ओळख पत्र बाबत गावागावात कॅप सुरू करून जनजागृती..." धुळे जिल्हा(धुळे गोकुळ देवरे.) दि.२९ - केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येत असलेल्या ॲग्री स्टॅक योजनेबाबत माननीय जिल्हाधिकारी तसेच मा.उपविभागीय अधिकारी व मा. तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लामकानी मंडळ भागातील लामकानी बोरीस, चिंचवार,निकुंभे, बुरझड या सर्व गावातील सर्व शेतकऱ्यांची फार्मर आयडी बनवण्यासाठी कॅम्प राबवण्यात येत आहेत. त्यासाठी लामकानी ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) शेतकरीनां योग्य मार्गदर्शन करीत असून मंडळातील सर्व सी एस सी केंद्र चालक व बोरीस येथील पेडकाई सीएससी केंद्रचालक गणेश सदाशिव महाले कॅम्प बाबत जनजागृती करत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी तयार करण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. AGRI-SACKT काय आहे ?शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे,शेतक-याने पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनांची कार्यक्षमतापूर्ण अंमलबजावणी करणे होय.फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :शेतक-यांचे आधार कार्ड आधार संलग्न मोबाईल क्रमांक शेतक-याचे सर्व ७/१२ AGRISTACK / फार्मर आय डी चे फायदे-पी एम किसान योजना शेतकरी कर्ज वितरण सुलभता,पिक विमा योजना पीक हमीभाव खरेदीसाठी मदत,किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण,महा डी बी टी वरील कृषी विभागाच्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनाच्या कृषी बाबतच्या सर्व योजनांसाठी अत्यावश्यक फार्मर आय डी काढण्याची यासाठी सुविधा -ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सी.एस.सी सेंटर ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहायक व ग्राम विकास अधिकारी आपले सरकार सेवा केंद्र व सर्व सेतू आहे. कार्यालय सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की तात्काळ आपला फार्मर आय.डी तयार करून घ्यावा.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post