-->

विज पुरवठा वारंवार खडंती हेत असल्या मुळे नगांव च्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालया समोर आंदोलन नगांव दि.३१ - नगांव परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याने नगांव गावातील शेतकरी त्रस्त नगांव शिवारात गेल्या एक दीड महिन्यापासून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी न्याहळोद येथील विज सप्टेशन येथून नगांव शेत्रातील शेतीत वीज पुरवठा करण्यात येतो परंतु वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्या मुळे नगांव गावातील शेतकर्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. या वेळी शेतकरी पप्पू पाटील यांनी कपडे काढून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. या वेळी प्रमोद पाटील, पिंटू पाटील, भगवान पाटील, प्रभाकर पाटील यांच्या सह नगांव, बिलाडी शिवारातील शेतकरी उपस्थित होते. दोन महिन्यांपासून रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती. यावर्षी चांगला पाऊस असल्याने शेतकरी समाधानी आहे. रब्बी हंगामातशेतकऱ्यांना गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी पिकांना रात्रं दिवस पाणी देण्यासाठी धडपड करावी लागते. मात्र, दिवसा व रात्री सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. आता रब्बी हंगामातील पिके जोमात आहे. मात्र, वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी दिले जात नाही. ही समस्या गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरू असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी न्याहळोद सप्टेशन च्या नगांव येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. या वेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्ही या विषयावर काहीही निर्णय घेऊ शकत नाही. वीजपुरवठा खंडित वरिष्ठांना अतिरिक्त रोहित्राचा प्रस्ताव दिला ज्या ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा होत नाही त्या ठिकाणी विद्युत रोहित्रावर जास्तीचा भार आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी अतिरिक्त विद्युत रोहित्राचा प्रस्ताव पाठवला आहे. नियोजन मंडळात निधीची तरतूद झाल्यावर विद्युत रोहित्र बसवता येईल. अनिल पाटील, कनिष्ठ अभियंता, वीज कंपनीहोतो त्यावर काही उपाययोजना करू शकत नाही असे उत्तर दिले. त्यामुळे संतप्त शेतकरी पप्पू पाटील यांनी अंगावरील कपडे काढून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कार्य व्यवस्थेचा निषेध नोंदवला. दोन वायरमन मागतो पैसे• गेल्या अनेक दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. पिके करपू लागली आहे. शेतकऱ्यांकडून विद्युत रोहित्र दुरुस्तीपासून प्रत्येक कामासाठी पैसे घेतले जातात. वायरमनही मजुरीचे पैसे मागतो. गरजे पोटी शेतकऱ्यांना पैसे जमा करावे लागतात. प्रशासनाने या विषयी गंभीर दखल घ्यावी.पप्पू पाटील, शेतकरी, नगांव परिसरात दिवसांच्या आत नगांव व बिलाडी शिवारात सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी घोषणाबाजी झाली.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post