सन्माननीय आबासो श्री संजीवन सिताराम पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न साक्री (परवेज सैय्यद) दि.३१ - सन्माननीय आबासो श्री संजीवन सिताराम पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न तथा पवार परिवाराचे कुटुंब प्रमुख व कै अप्पासो सिताराम जयदेव पवार यांचा वारसा अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष चालवणारे तसेच स्वतःची नोकरी प्रामाणिक पणे करुन अथक ३६ वर्षे ३ महिने १७ दिवस कोणतीही कर्तव्यात कसूर न करता तिन्हहि कृतूत संपूर्ण पवार कुटुंब व रुणमळी गावातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिले त्यांचा दि. २८ मे २०२५ रोजी यशस्वी व आनंददायी सेवापूर्ती चा कार्यक्रम त्यांच्या तलवाडी जि नंदुरबार या शाळेवर उत्साहात पार पडला त्यावेळी आप्तेष्ट सोबत काम केलेले शिक्षक तथा कर्मचारी वृंद यांचे अबांविषयी विचार मांडतांना डोळे पाणावले होते आणि तिच आबांच्या आयुष्याची खरी कमाई असल्याचे त्या क्षणी लक्षात आले, आबासाहेब सदर तलवाडी शाळेवर १३ वर्षे एक कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झालेत त्याप्रसंगी आमच्या आई , मोठ्या वहिनी , संपूर्ण पवार कुटुंब तसेच मित्रपरिवार आप्तेष्ट उपस्थित होते. आबांना परमेश्वर पुढील आयुष्य सुधृड व आरोग्यदायी देवो ही प्रार्थना करुन आबांना एक विनंती करू इच्छितो की यापुढील आयुष्य आप्पासो कै सिताराम जयदेव पवार यांच्यासारखे गावातील व परिसरातील गोरगरीब जनता , समाजबांधव तथा मित्रपरिवाराच्या सुखदुःख सदैव हजर राहून जनसेवा करावी ही विनंती. आमचे तसेच कुटुंब व गावाचे कल्याणकारी मार्गदर्शक बनून कै आप्पासो यांचा वारसा चालवून मागील ९ वर्षाची आप्पांच्या नावाची पोकळी व जनतेला जाणवणारी उणीव भरून काढावी व सगळ्यांचा सांभाळ करावा ही सर्वांतर्फे विनंती करतो व परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपणांस यशस्वी सेवापुर्ती निमित्त संपूर्ण पवार परिवारा तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन तथा भावी आयुष्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा
byloksahi.varta.news
-
0