धुळे दि. २० धुळे शहर/ - धुळे शहरात असलेले मध्यवर्ती बस स्थानकाचा जवळ असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका (पुतळ्या) मागील असलेले विनोद वाईन शॉप हटविल्याचा आनंदोत्सव साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटपाचा कार्यक्रम.. बहुचर्चित आणि प्रचंड गाजलेल्या धुळे शहरातील जेल रोडवरील विनोद वाईन शॉप हटविण्याच्या आंदोलनाचा विजयोत्सव मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले मद्यविक्रीचे बिनोद वाईन शॉप स्थलांतरीत होत नाही तो पर्यंत बंदच ठेवण्यात यावे असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष संघटनांनी अनेकदा आंदोलने केली होती. आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे व पॅंथर आबासाहेब अमृतसागर धुळे जिल्हा अध्यक्ष आजाद समाज पार्टी दावलची वाघ धुळे जिल्हा महासचिव मुकेश भाई वाघ धुळे जिल्हा संघटक भैय्यासाहेब वाघ धुळे शहराध्यक्ष चिंतामण थोरात धुळे तालुका अध्यक्ष किरण भालेराव धुळे शहर उपाध्यक्ष त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यापासून निवेदने, मोर्चे, चक्काजाम, तोडफोड, ठिय्या आंदोलन आणि शेवटी सात जणांसह ९ दिवस आमरण उपोषण केलं होतं. याच दरम्यान दलित समाजाने उत्स्फुर्तरित्या शहरातील विविध भागांमध्ये तसेच महामार्गांवर ५ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करीत ठिय्या आंदोलन केलं होतं. यामुळे प्रशासनावर विनोद वाईन शॉप हटविण्याबाबत प्रचंड दबाव वाढला होता. परिस्थिती ओळखून शहराचे आमदार फारुख शाह यांच्या मार्फत मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आमदारांच्या हस्ते उपोषण आंदोलन थांबविण्यात आले. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबजलने स्वच्छ धुवून २०० गरजू विद्याथ्यांना वह्या-पेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करून संवैधानिक मागनि आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महसूल, पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंदोलनांची दाखल घेऊन शासन निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले. हा विजय हा मोठ्या संघर्षाचा विजय आहे. हा विजय कोना एकाच नसून विनोद वाईन शॉपविरोधात लढणाऱ्या सर्वच आंदोलकांचा, आंबेडकरी जनतेचा विजय आहे. अशी भावना यावेळी आनंद लोंढे यांनी व्यक्त केली. तसेच मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधिक्षक धुळे व राज्य उत्पादन शुल्क धुळे विभाग यांनी आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात सदर वाईन शॉप हटविण्यासाठी जे शासकीय प्रयत्न केले त्याबद्दल आंबेडकरी समाजामार्फत आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस उपअधिक्षक मा. किशोर काळे साो. पो. नि.धीरज महाजन सर,धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते सामाजीक कार्यकर्ते जितेंद्र भाऊ शिरसाठ, आ. फारुक शाहंचे चिरंजीव शाहबाज शहा, मुकुदराव बापूजी शिरसाठ, आनंद सेंदाणे, मुकेश खरात, बॉबी वाघ, संजय अहिरे, विनोद केदार ,देविदास दादा जगताप,पप्पूभाई सहानी, राज आबा चव्हाण, रामकृष्ण नेरकर,दिलीप भामरे, मनीबाबा खैरनार, ज्ञानेश्वर भामरे, चंद्रकांत सत्तेसा, रत्नशिल सोनवणे, कैलास बाविस्कर, सत्तेसा सर, बाविस्कर सर, गव्हाणे सर,, तात्या चव्हाण, मंगलदास बाघ, संजय चव्हाण, सुरेश अहिरे, वाल्मिक जाधव, रंजना इंगळे, सिध्दार्थअण्णा जगदेव, नासिर पठाण, इकबाल शहा, आसिफ शहा, अफसर शहा, अॅड. शितल जावरे, आकाश सोनवणे, सत्तेसा सर, विनोद केदार, गौतम पगारे,संजय सरदार, झाल्टे सर, डॉ. शरद भामरे, अनंत दामोदर, किरण दादा मोरे, योगेश जगताप, दिलीप मोहिते, अॅड. संतोष जाधव, भैय्या पारेराव, अप्पा गरुड, सागर बापू सोनवणे, दिनेश निकम, ईश्वर वाघ, कवि सुभाष जावरे, रोहित सोनवणे, निलेश जिरे, भोला अहिरे, भॐषण जोशी, आप्पाजी साळवे, तसेब महिला भगिनी नयना दामोदर, सरोज कदम, कल्पना सामुद्रे,विजू सावकारे, निर्मला साळवे तसेच बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व विविध विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, ज्येष्ठ नागरीक संघ पदाधिकारी यांच्यासह बापू थोरात, पप्पू पगारे, सुरेश बिन्तीया, सुनंद भामरे, बी. यु.वाघ, चव्हाण सर, गुलाले दादा, विनय मोरे, प्रदीप बागले, विशाल पगारे, रामकृष्ण नेरकर, लखन चांगरे, चिंतामन थोरात, देवरे, बाविस्कर, गौतम पगारे, धनराज पवार, रमाकांत खंडारे, पी. यु.पवार आदी उपस्थित होते. या लढ्यास साथ देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे ही मनापासून आभार मानलेत...
byloksahi.varta.news
-
0