-->

शिंदखेडा दि.१९ - कलमाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा अन्यायाने खितपत पडलेल्या जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, सर्वसमावेशक शासनकर्ते, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत कलमाडी गावात शिवजयंती उत्सव साजरा या कार्यक्रमासाठी कलमाडी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच गावातील संरपच व उपसरपंच व ग्रामपंचायतील सर्व सदस्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास फुलपुष्प अर्पण करीत जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय घोषणा करीत शिवजयंती आनंद उत्सव संपन्न झाला तसेच शिवजयंतीनिमित्त कलमाडी गावात संपूर्ण गावात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात आला तसेच गावात गल्लीत रांगोळी काढण्यात आल्या आणि संपूर्ण गावाने मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारका जवळ जमऊन जय भवानी, जय शिवराय...घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास फुल पुष्पहार अर्पण करून कलमाडी गावात मिरवणूक काढण्यात आली समस्त शिवभक्तांच्या व शिवजयंती उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपस्थिती राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व भव्य मिरवणुकीमध्ये उस्फुर्त सहभाग घेतला यावेळी सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व तरुण शिवछत्रपतींच्या जयघोषात तल्लीन झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषाने परिसर दुमदुमला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा-२०२४ निमित्त समस्त कलमाडी ग्रामस्थ व तरुण मित्रांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post