-->

साक्री दि.०१(परवेज सैय्यद) - रूनमळी गावाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आप्पासाहेब.......कै. सिताराम जयदेव पाटील उर्फ आप्पासाहेब, रूनमळी, हे मुळगाव. साक्री तालुक्यातसंपूर्ण मित्र परिवारामध्ये आप्पासाहेब म्हणून ओळखले जाणारे, लहानपणापासूनच सामाजिक शैक्षणिक राजकीय कृषी क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक मिळवला होता असे आप्पासाहेब समाजातील गोरगरिबांना मदत करण्यास नेहमी अग्रेसर असत. संपूर्ण पवार परिवाराच्या कुटुंबीयांना योग्य ते मार्गदर्शन करणारे आप्पासाहेब म्हणजे आमचे संपुर्ण रुनमळी गावाचे प्रेरणास्थान होते.खरं म्हणजे आप्पासाहेब हे स्वतःसाठी जीवन जगलेच नाहीत त्यांच्या सकाळची सुरुवात हि दुसऱ्याचे जीवन सुखमय कसे होईल या विचारानेच होत असे आणि यासाठीच ते सदैव तत्पर असत. समाजातील कुठल्याही व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे काम असो त्यात ते स्वतःला वाहून घेत व समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझा आनंद असं समजून ते लोक सेवा करीत असत. स्वतः उन्हात राहून इतरांसाठी सावलीसारखे काम केले. कोणतेही आणि कोणाचेही काम असो आप्पासाहेब,सदैव तत्पर असत. योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन व सतत प्रयत्न यामुळे आप्पासाहेबांनी जनसामान्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. संपूर्ण माळमाथा परिसरात आपल्या गावासह इतर गावांशी त्यांचे तालुकाभर संबंध होते. कोणती शासकीय योजना आणून तिची अंमलबजावणी कशी करता येईल व गावाचा विकास कसा साधता येईल यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत तत्पर राहिले. गावात येणारे कोणतेही अधिकारी असतील, राजकीय व्यक्तिमत्व असतील ते आल्याबरोबर आप्पासाहेबांनी विचारपूस करीत व वेळप्रसंगी राजकीय सल्ला सुद्धा आप्पासाहेब कडून घेत असत.मला चांगल आठवत आप्पासाहेब मरण्याचा उंबरठ्यावर होते तरी त्यांना गावाची चिंता वाटत होती कारण जो पर्यंत आप्पासाहेब होते तो पर्यंत गावात कुठलाही गैैरप्रकार गावात झाला नाही जितकं गावावर प्रेम होतं तितकच मित्रांवर खुप प्रेम होतं आणि त्यांनी त्यांचा आयुष्यामध्ये आप्पासाहेबांनी मित्र खूप जोडले तो सुद्धा मी सोबत राहुन अनुभव घेतलेला आहे.तसेच ज्यावेळी आप्पा साहेबांची देवाज्ञा झाली त्यावेळी संपूर्ण रुणमळी गाव शोकाकुल झाले होते जितकं दुःख गावातील लोकांवर व समाजावर होते तितकेच दुःख गावातील आदिवासी समाजावर सुद्धा झाले होते कारण पाटील समाजाने आप्पा साहेबांचं दशविधीचा कार्यक्रम केलाच त्याच्या पाठोपाठ आदिवासीनी सुध्दा संपूर्ण जिल्ह्यात आजवरपर्यंत कोणीही दशविधीचा कार्यक्रम केला नव्हता तो आमच्या गावाने आदिवासी बांधवांकडून आप्पासाहेबांचा कार्यक्रम केला होता. आज पण रुनमळी गावाला आपली पोकळी निर्माण झालेली वाटत आहे तरी आम्ही आज भी आपले विचार आचारात गावात मांडत असतो. याचा पुढे गावात आपल्या विचारांनी गाव चालु देऊ जसा की आपण एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तसाच आपल्यासारखा शब्द पाळण्याचा आम्ही प्रयत्न करू आपल्या जिल्ह्यातील अनेक नेते कै. आप्पां या नावाने हाक मारीत असत. नातेवाईकांमध्ये कोणतेही काम कोणत्याही राजकीय पुढार्‍याकडे असो आप्पासाहेब अतिशय खंबीर उभे राहत. सुखदुःखामध्ये आम्हा सर्व पुतणे मंडळींना मार्गदर्शन करणारे आप्पासाहेब आज आमच्यात नाहीत. त्यांची उणीव आम्हाला जाणवते.आप्पांनी राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचे स्थान मिळवले होते. अनेक वर्ष गावाचे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अशा निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये आप्पासाहेब अत्यंत सक्रिय असत. आप्पांनी शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्यात खूप पैसा जरी कमावला नसला तरी माणुसकी त्यांनी कमावलेली आहे हे त्यांच्या वागण्यातून आम्हाला नेहमी जाणवत असे.आमच्या आदरणीय आप्पासाहेब यांच्या सहकार्यामुळेच आप्पांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वेळ देऊ शकले. आप्पाचे मुलं जावई आज त्यांच्या क्षेत्रात स्थिर स्थावर आहेत परंतु आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे आप्पासाहेब आजही आम्हाला हवेहवेसे वाटतात. अश्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास सर्व रुणमळी ग्रामस्थांकडून व पवार परिवारातर्फे विनम्र अभिवादन.....शोकाकुल.......श्री दिलीप पवार तालुका अध्यक्ष रेशन दुकानदार संघटन साक्री


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post