-->

गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय नगांव येथे योग दिन साजरा नगांव दि. २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला जगातील सर्व लोकांनी यात सहभागी व्हावे व भारत स्वस्थ निरोगी राहावा यासाठी योग दिन साजरा केला जातो याप्रसंगी योगशिक्षक श्री.जयंत विभांडीक यांनी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना योगा बद्दल माहिती दिली,तसेच सर्वांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. याप्रसंगी बोलताना श्री विभांडीक यांनी योग आणि व्यायाम यामुळे सकारात्मक विचार निर्माण होतात, माणसाचे मन शांत होते व सर्वांगीण विकास होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असे प्रतिपादन केले, योग केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, शरीर उत्साही व निरोगी राहते व अनेक आजार कमी होता. हृदय व फुफ्फुस चांगले राहते त्यासाठी प्राणायाम व वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्राणायाम कपालभाती सूर्यनमस्कार व विविध आसने त्यांनी सर्वांकडून करून घेतले त्याचबरोबर प्रत्येकाचे महत्व विशद केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वि एम पाटील यांनी आपल्यातील नकारात्मकता काढून सकारात्मक विचार करण्यासाठी योग व व्यायाम नियमित केल्याने शरीर स्वास्थ व मन खुश व शांत राहते त्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वकर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य प्रा. गोविंद पोद्दार व रजिस्ट्रार सारंग पाटील यांनी केले


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post