ऑल इंडिया पॅंथर सेनेचा राज्यस्तरी कार्यकर्ता महामेळावा 2026 व पॅंथर भूषण पुरस्कार सोहळा संपन्न नाशिक दि.26 - ऑल इंडिया पॅंथर सेनेचा राज्यस्तरी कार्यकर्ता महामेळावा 2026 व पॅंथर भूषण पुरस्कार सोहळा संपन्न दिनांक 25 ऑक्टोबर 2026 वार रविवार रोजी नाशिक येथे सकाळी 11 वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे ठिकाण सिटी भवन आयटीआय सिग्नल सातपूर नाशिक या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता महामेळावा 2026 व पॅंथर भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. दिपक भाई केदार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकर्ता महामेळावा 2026 व पॅंथर भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला तसेच धुळे जिल्ह्यासाठी जिल्हा संघटक म्हणून धुळे तालुक्यातील नगांव गावातील पहेलवान दुर्योधन श्रीराम पाटील यांची ऑल इंडिया पॅंथर सेनेत धुळे जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली असून तसेच संपूर्ण जिल्हा बांधण्याची जबाबदारी दुर्योधन पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे असे ठामपणे सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी सांगितले आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश उर्फ सागर भाऊ मोहिते यांच्या नेतृत्वाने पूर्ण धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित झाले होते कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट उस्फूर्तपणे आनंदमय पार पडला
byloksahi.varta.news
-
0