-->

हस्ती बँक निजामपूर शाखेस प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त.. हस्ती बँक निजामपूर शाखेस प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त.. निजामपूर (परवेज सैय्यद) दि.०८आषाढी एकादशी रोजी उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नावाजलेले नाव म्हणजे दि.हस्ती को.ऑप.बँक.दोंडाईचा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.सभेस बँकेचे चेअरमन श्री.कैलासजी जैन,व्हा.चेअरमन श्री.दिलीपजी चोरडिया,बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन श्री.मदनभाऊ जैन,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सतीशजी जैन सभासद वर्ग,सर्व शाखांचे समिती चेअरमन,सदस्य,कर्मचारी वृंद,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी बँकेच्या सर्व शाखांना त्यांच्या व्यवसायावर आधारित प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आला.यात सन २०२४ -२०२५ या आर्थिक वर्षासाठी रु.४० कोटी पर्यंत व्यवसाय असणाऱ्या गटात "निजामपूर शाखेला" प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.सदर पुरस्कार प्रसिद्ध सी.ए.मा.श्री.एल.बी.जैन सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पुरस्कार स्वीकारतांनाशाखा चेअरमन श्री.पंडित मुरलीधर बदामे,व्हा.चेअरमन,श्री.नयन शाह, समिती सदस्य डॉ.श्री.प्रकाश गवळे,श्री.भगवान धामणे,प्रा.श्री.सुधाकर जाधव,श्री. विजय रेलन,श्री.प्रशांत पाटील,शाखा व्यवस्थापक श्री.पराग शाह व निजामपूर शाखेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.बँक ग्राहकांच्या सोयी करिता सदैव तत्पर सेवा देण्यास बांधील असून बँके कडून ग्राहकांना त्वरित RTGS, NEFT, ATM सह सुटीच्या दिवशीही रोख भरणा करण्याण्यासाठी सी.डी.एम. मशीन, मोबाईल बँकिंग यां सर्व सुविधा उपलब्ध असून आता नेट बँकिंग ही सुविधाही सर्व व्यापारी व खातेधारकां करिता उपलब्ध करीत आहोत.आकर्षक सोलर योजना,त्वरित सोने तारण योजना,माल तारण कर्ज,लहान मोठे वाहन कर्ज,गृह कर्ज,व्यापाऱ्यांसाठी कॅश क्रेडिट कर्ज योजना,लहान व्यापाऱ्या करीता हस्ती सुलभ कर्ज योजना, डॉक्टर व सी. ए. यांच्यासाठी प्रोफेशनल कर्ज योजना, ठेवीवर जेष्ठ नागरिकांना व ठेवीदारांना आकर्षक व्याजदर आहे.अद्ययावत व सुरक्षित लॉकर सुविधा.संस्था हि केवळ सहकारच नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान,नेत्र तपासणी शिबीर प्रत्येक वर्धापन दिनी आयोजित करीत असते,तसेच वृक्षारोपण सारख्या निसर्गपूरक उपक्रम देखील आयोजित करीत असते. "प्रतिज्ञा आमची प्रगती तुमची" हे ब्रिद वाक्य जोपासत ग्राहकांच्या सेवेत बँक सदैव तत्पर आहे.तरी ग्राहकांनी आपला व्यवहार हा हस्ती बँके सोबत करून वरील सर्व सुविधां चा लाभ अवश्य घ्यावा, असे आव्हान निजामपूरचे प्रतिष्ठीत व्यापारी व शाखा चेअरमन नाना श्री.पंडित बदामे यांनी केले...


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post