-->

ग्रीन नगांव टीम, व नगांव ग्रामस्थ मिळून पंचशील स्तंभ, पेट्रोल पम्प, गोंदूर रोड परिसर आणि गावातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले आणि ट्री गार्ड बसवण्यात आले नगांव दि.०७ जुलै वार रविवार रोजी सकाळी ग्रीन नगांव टीम, व नगांव ग्रामस्थ मिळून पंचशील स्तंभ, पेट्रोल पम्प, गोंदूर रोड परिसर आणि गावातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले आणि ट्री गार्ड बसवण्यात आले ज्या व्यक्तीच्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले त्यांनी स्वतःहून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आज पूर्ण गावात 200 वृक्षारोपण करण्यात आले तसेच 100 ट्री गार्ड बसवण्यात आले तसेच 500 सीड बॉल रोपण करण्यात आले नगांव ग्रामस्थानी उस्फुर्त प्रतिसाद व सहभाग घेतला, बालक, महिला, तरुण, वृद्ध सर्वजन सहभागी होत आहेत आनंदी वातावरणात सर्व लोक सहभागी होऊन श्रमादान करून वृक्षारोपण करत आहेत तसेच त्यांची संगोपन करण्याची जबाबदारी स्वतः स्वीकातर आहेत सर्व ग्रामस्थांचा असाच सहभाग राहिला तर लवकरच येत्या काही वर्ष्यात सर्व नगांव गाव आणि परिसर हिरवेगार होईल असे ग्रीन नगांव टीमचे डॉ. भूषण भदाणे नगांव यांनी म्हटले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन शिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप उष्णतेचा प्रभाव कमी होतो. निसर्ग आपला मित्र 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' तुकाराम महाराजांनी निसर्गाशी आपले नाते सांगणारी ही सुंदर ओवी आपल्याला सांगितलेली आहे. तसेच अनेक संतांनी, लेखकांनी त्यांच्या ओवीतून, लेखनातून निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहेत. निसर्ग हे देवाने आपल्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post