आषाढी एकादशी दिवशी वाहतुक मार्गात बदल धुळे शहर वाहतूक तर्फे सुचना धुळे दि. १७ (गोकुळ देवरे.) - आषाढी एकादशी हा सण साजरा होत असुन सदर सणानिमित्त धुळे शहराचे मालेगांव रोडवरील पुरातन श्री. विठ्ठल मंदिर परिसरात यात्रा भरत असते. दरवर्षी प्रमाणे भाविकांची सदर दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते तसेच यावर्षी देखील होण्याची शक्यता असुन, आषाढी एकादशी सणानिमित्त सदर रोडावर यात्रा भरत असल्याने वाहतुक मार्गात बदल करणे आवश्यक असतो आणि आता देखील केला आहे. सदर यात्रा / धार्मिक उत्सव निमित्ताने धुळे शहरातील मालेगांव रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने सदर सण / उत्सव दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच अपघात होवुन जिविताचे व मालमत्तेचे नुकसान होवु नये यासाठी अग्रसेन पुतळा ते दसेरा मैदान कडे जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आषाढी एकादशी दिवशी दिनांक १७ जुलै. २०२४ रोजीचे सकाळी ०५.०० ते रात्री २२.०० वाजेपावेतो सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तात्पुरता बंद करण्यात येत आहे.आषाढी एकादशी सण / उत्सवाचे काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणुन मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३३ (१) (ब) नुसार अग्रसेन पुतळा ते दसेरा मैदान हा रस्ता सार्वजनिक वाहतुकी करीता दिनांक १७ जुलै २०२४ रोजीचे ०५.०० ते २२.०० वाजेपावेतो बंद ठेवण्यांत येत आहे. सदर रोडवरील वाहतुक ही अग्रसेन पुतळा, व ८० फुटी रोड, रेल्वे स्टेशन रोड मार्गे, दसेरा मैदान अशी वळविण्यात येत आहे म्हणून सर्व वाहनधारकांनी वरील प्रमाणे मार्गाचा वापर करावा.
byloksahi.varta.news
-
0