-->

मुबई दि.१३ - १३ऑगस्ट २०२४ रोजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल दादर या स्मारकाचे काम जलद गतीने व्हावे याकरिता सर्व संघटनांच्या वतीने एम एम आर डी ए आयुक्त साहेबांना भेटून स्मारकाला जलद गतीने काम पूर्ण करावे. एक मतांनी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रश्न उपस्थित केला. आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना एकत्र येऊन आव्हान करण्यात आले आहे. मी बोलताना आठवण करून दिली की, २०११ साली सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलेल्या आंदोलनानंतर माननीय पंतप्रधान महोदय यांनी भूमिपूजन २०१६ मध्ये करून देखील आठ वर्ष पूर्ण होत आलेत तरीही स्मारकाचे काम होत नसल्यामुळे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली विलासभाऊ रुपवते यांनी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला दिलेल्या निमंत्रणानुसार सुरुवातीपासूनच एक आंदोलक म्हणून काम करत असल्यामुळे इंदू मिल बाबत अत्यंत ठामपणे भूमिका मांडली. स्मारक जलद गतीने व्हावे यासाठी सर्व संघटना एक मताने हा लढा उभारणार या बैठकीत प्रशासनाचे अधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच अक्षय दिलीपराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, आंबडवे भावकीचे अध्यक्ष सुदर्शन सकपाळ आधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. आपला नम्र कामगार नेते रमेश मारुती जाधव


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post