-->

गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात अवयव दान दिन साजरा नगाव दि.१३ - गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय नगाव व इनरव्हील क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये धुळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर व इनर व्हील क्लब च्या अध्यक्षा सौ. संगीता गिंदोडिया यांनी अवयव दान का करावे त्याचे फायदे काय असतात, त्याचे प्रकार व कोणत्या प्रसंगी कोणता अवयव दान केला जातो, हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये सांगितले. ब्रेनडेड म्हणजे काय? त्यावेळेस कोणते अवयव दान करता येतात. कोणता अवयव किती वेळात दान केल्यानंतर दुसऱ्या रुग्णास देता येतो. अवयव दानातील अनेक समज-गैरसमज डॉ. गिंदोडिया यांनी दूर केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एम. पाटील यांनी जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान आदी देशात एक लाख मृत्यूच्या मागे ५० जण अवयवदान करतात. त्या प्रमाणात भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे. म्हणूनच ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या नव्या संकल्पनेनुसार कुटुंबातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केला पाहिजे,असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. इनर व्हील क्लब च्या अध्यक्षा डॉ. सौ. संगीता गिंदोडिया,प्रसिद्ध कथाकथनकार सौ. रेखा मुंदडा, इनर व्हील धुळे च्या सेक्रेटरी सौ. कविता सोनार, एडिटर सुरेख सक्सेना यांनी महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. दर्शना बेडसे यांनी केले. आभार प्रदर्शन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. श्री. दीपक पाटील यांनी.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post