-->

निजामपूर येथे प्रथितयश हृदयरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे हृदयरोगावर व्याख्यानासह मोफत आरोग्य तपासनी शिबीर निजामपूर (परवेज सय्यद) दि.०७ -निजामपूर परिसर डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसियेशन, श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ आणी आदर्श विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कै.जितेंद्र गणेशलाल जायस्वाल यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी नासिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख संस्थापक तथा हृदयरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे "हृदयाचे आरोग्य" याविषयावर व्याख्यान होणार आहे. शिबिरात नाशिकचे मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ कुनाल निकम, डॉ रोहन दरेकर, डॉ शैलेश बडवर, डॉ जयेश रेलन आदी तज्ञ रुग्ण तपासनी करणार आहेत. यावेळी धुळे येथील सुप्रसिद्ध योगतज्ञ डॉ (ऍड)राजेंद्र निकुंभ,माजी सैनिक डॉ भगवान बोरसे, शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ गजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. श्री गणेशोत्सव काळात रविवार दि ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता निजामपूर येथील आदर्श विद्यामंदिरमधिल व्याख्यानात हृदयाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. धडधडणाऱ्या हृदयाची रचना, आजीवन कार्य, अमूल्य महत्व, हृदयाच्या व्याधी, हृदय विकारावरील व्यवस्थापण,आधुनिक निदान, अँलोपॅथीक उपचाराचे फायदे, हृदय शस्त्रक्रियेचे प्रकार, अत्यावश्यक सेवेचे महत्व ईत्यादी प्रमुख मुद्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. यावेळी शिबिरातील रुग्णांची रक्तातील साखर, ईसिजी, रक्त्दाब,मधुमेही रुग्णाची मागील तीन महिन्याची सरासरी साखरेची तपासणी देखील करण्यात येणार आहे.तपासणीअंती ज्या रुग्णांना अँजीओग्राफी, अँजिओप्लास्टी,हृदयाच्या बायपास ऑपरेशनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महात्मा फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत नासिक येथील अत्याधुनिक श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटयूटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रदीर्घ अनुभवप्राप्त, प्रथितयश हृदयरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानशैलीचा डॉक्टर्स,केमिस्ट,शिक्षक व तमाम गणेश भक्तांनी लाभ घेऊन आपले हृदय ठणठणीत ठेवावे असे आवाहन समस्त जायस्वाल समाज मित्रपरिवार व सर्व सहयोगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे..


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post