साक्री दि.२७ (परवेज सैय्यद) - साक्री आमदार मंजुळा ताई गावीत यांना मंत्रीमंडळात घ्या..ताहीर बेग मिर्झा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले पत्र निजामपूर.. साक्री विधानसभा मतदारसंघातुन दुसऱ्यादा निवडुन.आलेले आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावीत यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश करा.अशी मागणी निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य व गटनेते आमदार समर्थक ताहीर बेग मिर्झा यांनी शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे.आमदार मंजुळा ताई यांनी साक्री तालुक्याचा विकास केला आहे तरी सर्व समाजाला सोबत घेऊन विकास कामे केली आहे.शासनाकडुन मोठ्या प्रमाणात विकास निधी आणुन तालुक्याचा विकास केला आहे शासनाच्या कल्याणकारी योजना राबवुन जनतेला योजना लाभ मिळवून दिला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चा लाखो महिला ना लाभ मिळवून दिला आहे.. धुळे जिल्ह्यात.भाजपाचे चार आमदार व शिवसेनेचा एकमेव आमदार सौ मंजुळाताई गावीत निवडुन आले आहेत. आमदार मंजुळा ताई गावीत यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यास धुळे जिल्ह्यात शिवसेना मजबूत होईल.ताई दुसऱ्या दा निवडुन आल्या असुन.पक्षाशी एकनिष्ठ आहेत.याच्या.सारखा.संयमी.व सर्वाना सोबत घेवून जाणार्या.आमदाराला.मंत्रीमंडळात.घेतल्यास पक्ष वाढ होईल.साकी विधानसभा मतदारसंघात नियोजन बद्ध आणि कार्यकर्तयाना विश्वास घेऊन विकास कामे होतील व धुळे जिल्ह्यात होणार्या.जिल्हा परिषद.पंचायत समिती महानगर पालिका.नगरपालिका .नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना ला फायदा होईल तरी जनतेच्या कामासाठी.अग्रेसर असणारे विकास रत्न लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदार सौ मंजुळाताई गावीत यांना मंत्रीमंडळात समावेश करा अशी मागणी निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य व आमदार सौ मंजुळाताई गावीत समर्थक.ताहीर बेग मिर्झा यांनी केले आहे.
byloksahi.varta.news
-
0