-->

दि.२० डिसेंबर २०२३ - कलमाडी विजयी वर्षपूर्ती १ वर्ष पुर्ण कलमाडी वासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला , या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर संरपच म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो , पण तरीही गेल्या वर्षभरात गावाचा विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं माझं कर्तव्य समजतो...जनेतेने टाकलेल्या विश्वासाला वर्षपूर्ती निमित्त कामाचा लेखा जोखा ... १) - गावाच्या शेतकऱ्यांचा मुख्य मागणी असलेला वालखेडा वाट ही निवडणुनंतर तात्काळ पाणंद रस्त्याच्या माध्यमातून दर्जेदार रस्ता हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे , २) - सोनवद धरणाच्या पाटचारीतून पाणी हे गावच्या पांढरीच्या शेत तळ्यात टाकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला .. ३) - गावातील बंद पडलेले सगळे महिला शौचालय हे नव्याने दुरुस्त केले आहेत .. ४) - प्रकाश ओंकार पाटील ते सुधाकर पुंजू पाटील ह्यांच्या गल्लीत पेव्हर ब्लॉक बसवले आहेत ५) - कलमाडी फाटा ते कंपनी कडे नवीन एलडी स्ट्रीट लाईट बसवले.. ६) - सुरेश खंडेराव पाटील ते पंकज सिसोदे ह्यांच्या गल्लीत पेव्हर ब्लॉक बसवले ७) - श्री नामदेव भदाणे व श्री प्रीतिराज दादा ह्यांच्या घराकडे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून नवीन ३ इंच ८०० मीटर पाईप लाईन टाकून पाण्याची व्यवस्था केली... ८) - गावात ठिकठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसवले आहेत त्यात माळीच रस्ता , एम.आय.डी.सी. रस्ता , मोहन राजधर पाटील ह्याचे घराकडे , गावाच्या दर्शनीय भागावर लाईट बसवले आहेत ९) - गावात अनेक ठिकाणी नवीन गटार टाकून सांडपाणी व्यवस्थापन केले आहे १०) - गावात सर्वत्र रोषणाई मिळावी म्हणून लाईट टाकले आहेत...वरील कामे ही १ वर्षात केली आहेत , गावात ज्या ज्या माय बाप लोकांनी लाईट , सांडपाणी गटार , पिण्याचे पाणी , स्वच्छ्ता बाबत काम सांगितले ते तात्काळ आम्ही केली आहेत त्या सोबत शासकीय लाभ , आरोग्य सुविधा २४ तास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे , कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर नतमस्तक होऊन माफी मागतो , व उर्वरित काळात सगळी कामे पूर्ण करण्याचं आश्वासन देतो....कलमाडी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावं , माझं आवाहन आहे. कारण इथं कुण्या 'एका व्यक्तीचा' विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण गावाच्या विकास करण्याचं काम सुरुय.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post