धळे/ दि.२८ डिसेंबर २०२३ - अण्णासाहेब द.वा.पाटील प्रतिष्ठाण तर्फे तालुक्यात १ लाख दिनदर्शिकेचे वाटप ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते सन २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनधुळे ता.२७ - अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाण च्या माध्यमातून धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सेवाभावी उपक्रम गेल्या १० वर्षापासून जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहेत. मागील वर्षापासून तालुक्यात घरोघरी दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षी देखिल सन २०२४ च्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते काल दि.२७ डिसेंबर रोजी करण्यात आले आले. याप्रसंगी भाजपाचे महामंत्री श्री.विजय चौधरी,माजी केंद्रीय राज्यमंत्रेी खा.डॉ.सुभाष भामरे, शिंदखेडा विधानसभेचे आमदार श्री. जयकुमारभाऊ रावल, धुळे महानगरपालिकेच्या महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभेचे निवडणूक तथा जि. प. सदस्य राम भदाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतू अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाण तर्फे संपूर्ण मतदार संघात १ लाखाहून अधिक कॅलेंडर वाटप करण्यात येणार आहेत. सदर कॅलेंडर प्रकाशन ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी ना. गिरीष महाजन यांनी धुळे ग्रामीण मतदार संघात सुरु असलेल्या गोर-गरीब, सर्व सामान्य जनतेसाठी जे सामाजिक उपक्रम सुरु आहेत त्याबद्दल युवा नेते जि. प. सदस्य राम भदाणे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्यात. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर भाजपाचे महामंत्री श्री. चौधरी, खा. डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमारभाऊ रावल, महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी आदींनी जि. प. सदस्य राम भदाणे यांचे सुरु असलेल्या सामाजिक , शैक्षणिक सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करत अभिनंदन केले. यावेळी जि. प. सदस्य राम भदाणे आभार व्यक्त करतांना म्हणालेत धुळे ग्रामीण मतदार संघात अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाणतर्फे सर्वसामान्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा निश्चितचन सर्व सामान्य जनतेला लाभ मिळत असतो. आधी समाजकारण मग राजकारण यापद्धतीने माजी आमदार कै. अण्णासाहेब यांना अभिप्रेत असलेले काम मला धुळे ग्रामीण मतदार संघात करावयाचे आहे असे यावेळी बोलतांना म्हटले जि.प. सदस्य राम भदाणे
byloksahi.varta.news
-
0