दि.०४ डिसेंबर २०२३ दुपारी ११:३० वाजेच्या दरम्यान धुळे शहरात संतोषी माता चौक परिसरात आझाद समाज पार्टीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलना संदर्भात ४ प्रमुख मागण्या १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला राहील असे या वेळेस आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आनंद लोंढे म्हणाले तसेच त्यांच्या प्रमुख मागण्या १) विटाई तालुका जिल्हा धुळे या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत... २)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बस स्टॅन्ड येथील पुतळ्याजवळील विनोद वाईन शॉप त्वरित स्थलांतरित करण्यात यावे. ३) विटाई तालुका साक्री जिल्हा धुळे या गावातील धुळे जिल्ह्यातील मौजे विटाई येथील गट नंबर २३३ पैकी ५ एकर १५ गुंठे प्रत्येकी वन जमीन अनुसूचित जाती , जमाती यांच्या नावे होण्याबाबत. ४) विटाई गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मंजुरी झालेल्या जागेलगत असलेली मुतारी योग्य ठिकाणी हलवण्यात बाबत... असे या वेळेस आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागण्या मागण्यात आल्या
byloksahi.varta.news
-
0