-->

निम्नपांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे पाणी बुरझड सातपायरी धरणांत टाकूण पाणी आरक्षणासाठी प्रयत्न करणार ! जि.प.सदस्य राम भदाणे यांचे जलसंघर्ष समितीला आश्वासन धुळे दि.०५ डिसेंबर २०२३ रोजी - तालुक्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे. तालुक्यातील लघुप्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत, कारण त्यांच्या उगमावर पाऊस पडला नाही त्यामुळे प्रकल्प कोरडे पडलेले आहे. अशाचप्रकारे बुरझड येथील सातपायरी धरण (लघु सिंचन प्रकल्प) कोरडा पडलेला आहे सदर धरणांत निम्नपांझरा अक्कलपाडा धरणाचे पाणी टाकण्यासाठी बुरझड पंचक्रोषीतील जल संघर्ष समितीच्या वतीने भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभेचे निवडणूकप्रमुख तथा जि.प.सदस्य राम भदाणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राम भदाणे यांनी संघर्ष समितीला सदर सातपायरी धरणांत पाणी टाकण्याचे व आरक्षीत करण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अक्कलपाडा धरणाचे पाणी सातपायरी धरणांत टाकल्यामुळे बुरझड, वडणे, नंदाणे, सायणे ह्या गावांना मिळाणार असून सदर गावांचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. सातपायरी धरणांस पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत व्यतिरिक्त कुठलाही स्त्रो नसल्यामुळे सदर प्रकल्पात जलसाठा कमी प्रमाणात असतो त्यामुळे बुरझड पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी व जल संघर्ष समिती च्या सदस्यांनी निवेदनाद्वारे निम्नपांझरा अक्कलपाडा धरणाचे पाणी डाव्या कालव्यातून सातपायरी धरणांत टाकण्यासाठी व आरक्षणासाठी जि.प.सदस्य राम भदाणे यांच्याकडे केलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थांशी बोलत असतांना राम भदाणे म्हणालेत की, राज्यात महायुतीचे सरकार असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभाग असून धुळे जिल्ह्याला ना.गिरीष महाजन सारखे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून लाभलेले आहेत. तालुक्यात दुष्काळावर मात करण्यासाठी व येणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन सदरची खरी परिस्थिती मंत्र्यांसमोर मुद्देसूद मांडण्यासाठी सदर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात याबाबत तत्काळ बैठकीच्या आयोजनाची विनंती उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जि.प.सदस्य राम भदाणे यांना निवेदन देतांना जल संघर्ष समितीचे सदस्य व ग्रामस्थ सर्वश्री मच्छिंद्र हिरालाल पाटील, ज्ञानेश्वर तानाजी पाटील, जगन्नाथ गोविंदा जाधव, सुनिल गोरख पाटील, शरद उत्तमराव पाटील, सुरेश उत्तम सावंत, चुडामण विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर गोरख पाटील, एन.डी.पाटील, संतोष सखाराम पाटील, दिनेश देविदास पाटील यांच्यासह बुरझड, नंदाणे, सायणे व वडण्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post