दि.२२ डिसेंबर २०२३ धुळे - आझाद समाज पार्टी आयोजित पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न..धुळे जिल्ह्यात आझाद समाज पार्टी तर्फे पक्ष प्रवेश सोहळा व पदानियुक्ती सोहळा आज दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता , पत्रकार भवन , संतोषी माता चौक धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रभारी मा. अविनाश जी शांती सर , प्रदेश अध्यक्ष मा. आनंदजी लोंढे सर , प्रदेश प्रवक्ते मा. ॲड. सुमितजी साबळे , संघटक मा. रविंद्रजी आरु सर युवा कार्याध्यक्ष मा. अमोल अहिर यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. धुळे जिल्हाध्यक्ष पँथर संतोष ( आबा ) अमृतसागर यांच्या नेतृत्वात यावेळी नवीन पक्षप्रवेश करणाऱ्या आझाद सैनिकांना पदनियुक्ती करून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या... सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते , तसेच महिला भगिनी उपस्थीत होत्या. सप्रेम जय भीम! -आनंद लोंढे (महाराष्ट्र अध्यक्ष , आझाद समाज पार्टी )
byloksahi.varta.news
-
0