-->

धुळे दि. १७ - धुळे तालुक्यातील सडगाव येथील माता भगिनी व तरुणांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कामगार पेट्याचे वाटप करण्यात आले. या पेट्यांमध्ये कामगारांसाठी जीवनावश्यक अश्या वस्तू उपलब्ध आहे .यामध्ये प्रमुख मच्छरदाणी, हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा, पाणी बॉटल, बॅटरीक, बूट अजून विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. जेणेकरून कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही..सडगाव येथील ४५ कामगारांना या पेट्यांचे वाटप करण्यात आले. कामगारांना पेट्या उपलब्ध करून देण्यासाठी तेथील माझे सहकारी श्री.धनराज वाघ, श्री. राजेंद्र वडपते यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी गावातील माता भगिनी, ज्येष्ठ व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.राघवेंद्र (रामदादा) भदाणे भाजपा विधानसभा प्रमुख धुळे ग्रामीण, जिल्हा परिषद सदस्य, धुळे


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post