धुळे दि.२७ - अजनाळे येथे बाळासाहेब भदाणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ विकास आणी प्रगतीपासून वंचित गावांना न्याय देणे हा माझा राजकारणाचा हेतू - बाळासाहेब भदाणे धुळे ग्रामीण:- धुळे तालुक्यातील अजनाळे हे गाव गेली अनेक वर्ष विकासापासून वंचीत आहे या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा सरचिटणीस श्री. बाळासाहेब रावण भदाणे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजुर झाली आहेत त्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा बाळासाहेब भदाणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कामानमध्ये मौजे अजनाळे येथे अमरधाम बांधणे,मौजे अजनाळे येथे शाळा दुरुस्ती,मौजे अजनाळे येथे शाळेला संरक्षक भित बांधणे, मौजे अजनाळे येथे गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे,मौजे अजनाळे येथे आदिवासी वस्तीत हायमास्ट सौरलाईट बसविणे, मौजे पाळद येथे शवपेटी भेट या ०१ कोटी रुपयाच्या विकास कामांचा समावेश आहे.गावातील मूलभूत सुविधा गावाच्या विकासाला पुढे नेण्याचे काम करत असतात. धुळे तालुक्यातील गावांमध्ये आमच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामे सुरु आहेत याचा सार्थ अभिमान आहे.अजनाळे येथे विविध विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी नागरिकांशी बाळासाहेब भदाणे यांनी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. धुळे तालुक्यात विविध विकास कामे होतं आहेत यापुढे ही नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्याचा आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाचा विकास करण्याचा माझा अजेंडा आहे, विकास आणि प्रगती पासून वंचित गावांना न्याय देणे माझा राजकारणाचा हेतू आहे, विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचे बाळासाहेब भदाणे यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले.यावेळी भाजप चे जेष्ठ नेते व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब रावण भदाणे,श्री. संतोष आण्णा अहिरे,धुळे म.न.पा नगरसेवक प्रशांतभाऊ बागुल, सौ.सारीकाताई बागुल,भाजपा उपाध्यक्ष श्री.अशोकभाऊ सुडके,मा. पंचायत समिती सदस्य सोपान पद्ममर,संरपंच सौ. कल्पनाताई शिंदे,उपसरपंच श्री. रमेश राजपूत,वि.कां.सो.चेअरमन श्री. जिभाऊ पाटील,श्री.राजु मराठे, श्री. सुरेश बोरसे, डॉ.अजय देवरे, श्री. दिपक खैरनार,श्री.भगवान राजपूत,श्री.पिरमसिंग राजपूत, सुरसिंग राजपूत,भावराव सनेर, उदेसिंग राजपूत, युवराज राजपूत, सोमासिंग राजपूत,भैय्यासाहेब फौंजी भाजपा सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ मंडळी,महिला भगिनी,तरुण सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0