दि.२६ - नगांव दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या काळात गंगामाई कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नगाव येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या ८ व १ विद्यार्थी B.sc ला आहे असे ०९ विद्यार्थ्यां ची एकाच वेळेस भारतीय सैन्यामध्ये निवड झाली आहे .निवड झालेल्या तरुणांमध्ये ३ तरुण नगांव गावातील असून त्यात (कल्पेश बारकू पाटील, हेमंत भागवत पाटील, निलेश राजेद्र पाटील ) तर २ कौठल गावातील (चेतन ज्ञानेश्वर पाटील, भावेश अशोक कोळी) आणि १ बिलाडी गावातील (सागर अरुण पाटील) १ गोंदूर गावातील (विशाल राकेश पाटील) तसेच १ जापी गावातील (महेंद्र राजू कापडे) व १ लामकानी गावातील (अजय रतिलाल महाले) धुळे तालुका येथील आहेत या सर्व तरुणांचे नगांव ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे अशातच बहुतेक तरुणांचा कल हा पोलीस भरती किंवा सैन्यदलामध्ये भरती होण्याकडे आहे यासाठी विविध परिक्षा सोबतच शारीरिक कसरती कडेही तरुण मोठ्या प्रमाणात लागले आहेत. अशाच तरुणांना महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी अधिक मार्गदर्शक ठरते याच प्रकारे नगांव येथील गंगामाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्याल नगांव येथील राष्ट्रीय छात्र सेनेचे ८ विद्यार्थ्यांची नुकत्याच झालेल्या सैन्यदलाच्या भरतीमध्ये निवड झाली आहे . अतिशय सामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व शालेय शिक्षण करून विविध शेती काम सोबतच अभ्यास राष्ट्रीय छात्र सेनेची कसरत आणि विविध परीक्षांसाठी सोबतच जात असत. गेल्यावर्षी भारतीय सैन्य दलामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती या भरती प्रक्रियेचा नुकताच निकाल घोषित झाला यात सदर तरुणांना एकाच वेळी निवड झाली आहे. यामुळे गंगामाई कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयासोबतच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नगांव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अधिकारी कर्नल एस.के.गुप्ता ४८ महाराष्ट्र बटालीयन धूळे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .निवड झालेल्या तरुणांचे गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मनोहरजी भदाणे व विद्यमान जि. प. सदस्य राम भदाणे, नगांव च्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योतीताई भदाणे व नगांव च्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
byloksahi.varta.news
-
0