विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांची नियुक्ती धुळे नगांव दि २३ - नगांव येथील गंगामाई एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस. आर. पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आधीसभेवर नामनिर्देशित सदस्य (सिनेट सदस्य ) म्हणून नियुक्ती झाली आहे. प्राचार्य डॉ एस .आर .पाटील यांनी यापूर्वीही विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर काम केले आहे .तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मिलिटरी सायन्स व एन. सी. सी. अभ्यास मंडळावर सुद्धा ते कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष मनोहरजी भदाणे संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ. ज्ञानज्योती भदाणे ( सरपंच नगांव ) आणि संस्थेचे सचिव राघवेंद्र भदाणे (जिल्हा परिषद सदस्य) , तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांचे अभिनंदन केले.
byloksahi.varta.news
-
0