संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी धुळे दि.२३ - संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी सामाजिक अन्यायाविरुध्द लढा देणारे थोर संत आणि समाजसुधारक गाडगे महाराज यांचा जन्मदिवस २३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्या निमीत्त संत गाडगे बाबा सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस फुष्पहार अर्पण करुन सामुहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य राम भदाणे व संत गाडगे बाबा सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे म्हणालेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे महाराज यांनी ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ उभी केली. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम ते स्वत: हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाज विकासाठी खर्च केला. लोकसेवेच्या उदात्त हेतूने संत गाडगेबाबांनी मिशनची स्थापना केली. मिशनचे हे कार्य अविरत चालू ठेवून संत गाडगेबाबांनी दिलेला लोकसेवेचा वसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. संत गाडगेबाबांनी दुर्बल, अनाथ, अपंगांसाठी आयुष्य वाहून घेतले. त्यांच्या दशसूत्री संदेशानुसार तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य अविरत होत राहणे आवश्यक आहे. असे यावेळी बोलतांना म्हणालेत. यावेळी जि.प.सदस्य राम भदाणे यांनी संत गाडगे महाराजांच्या केलेल्या कार्याचा थोर इतिहास मांडतांना म्हणालेत की, थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक थोर संत, कीर्तनकार, समाजसुधारक होते. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातातील खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्राभर फिरले. दिवसभर गाव स्वच्छ केल्यावर रात्री ग्रामस्थांची मने स्वच्छ करण्यासाठी ते कीर्तन, प्रवचन करत असत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे. त्यांचा या कार्याचा अभिमान आज आपल्या सर्वाना आहे. त्यांचे केलेले थोर कार्य पुढे नेण्याचे आपल्यासारख्या तरुणांचे आहे असे यावेळी म्हणालेत. कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळाने आयोजीत केला होता. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, जि.प.सदस्य राम भदाणे, मंडळाचे पदाधिकारी सर्व श्री.अमोल तुळशिराम गायकवाड, प्रविण माणिकराव शिंदे, शंकर(भोला)पंढरीनाथ सगरे, संजय रमेश गवळी, महेंद्र नथ्थू सगरे, कपील मधुकर पाराटे यांच्या सह कार्यकारकणी सदस्य यावेळी उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0