गंगामाई औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रोजी कॅम्पस संपन्न ! गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात नगांव दि.११ - मार्च रोजी मेगा कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण राज्यातुन विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून हजेरी लावली. मुलाखती घेण्यासाठी लुपिन, ग्लेनमार्क, मेगाफाईन, रेवफार्मा यासारख्या नामांकित कंपणींसाठी प्रोडक्शन, क्युए, क्युसी, मेंटेनन्स, पॅकेजिंग व मेडिकल कोडींग या जागांसाठी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीसाठी श्री. प्रदीप मोरे (ऑपरेशन मॅनेजर), श्री. चिंतामण मोरे (एचआर ऑफिसर) हे प्रतिनिधी उपस्थित होते. या मुलाखतीची सुरुवात सकाळी १० वाजेपासून नाव नोंदणी करून करण्यात आली. त्या नंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली. या उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी मा. दादासो. ऍडव्होकेट राजीवजी जाधव हे होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयांतील कॅम्पस मुलाखतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या मुलाखतीसाठी चाळणी परीक्षा, मुलाखत यासारखे विविध फेऱ्या घेण्यात आल्या. त्यामधून एकूण ६५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे ४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व इतर महाविद्यालयांतील १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. बाळासाहेब मनोहरजी भदाणे, उपाध्यक्षा माईसौ. ज्ञानज्योती भदाणे, अध्यक्ष दादासो. राघवेंद्र भदाणे, गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप, तसेच उपप्राचार्य ,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या मुलाखतीचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रा. डॉ. ज्योत्स्ना खेडकर, डॉ. निलेश सिसोदे, डॉ. नितीन शिरसाठ यांनी केले. तसेच यासाठी महाविद्यालयातील संपुर्ण प्राध्यापकवर्ग व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी मोलाची मेहनत घेतली.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post