शिव सोमनाथ यात्रा महोत्सवानिमीत्त आर्वी येथे विराट कुस्त्यांचा सामना रंगला निरोगिमय आरोग्यासाठी कुस्तीचा सराव नियमीत करावा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांचे प्रतिपादन धुळे ता.०८ -आर्वी ता.धुळे येथे सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सोमनाथ यात्रा महोत्सवानिमीत्त काल दि.०८ मार्च रोजी विराट कुस्त्यांच्या सामान्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पहिली मानाची कुस्ती भाजपचे धुळे ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा जि.प.सदस्य श्री.राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी सदरच्या कुस्तीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हे जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते करण्यात येते. सकाळी ०९ वाजेपासून ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत हा विराट कुस्तींचा सामना रंगला. याप्रसंगी भाजपाचे जि.प.सदस्य किशोर हालोर, पं.स.सदस्य जिभाऊ आण्णा शेणगे, माजी सरपंच नामदेव चौधरी,नाना खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. धुळे तालुक्यातील आर्वी येथे सालाबादाप्रमाणे शिव सोमनाथ यात्रा भरते. या यात्रा महोत्सवानिमीत सुमारे २७ वर्षापासून कुस्त्यांचे आयोजन करण्यात येत आहे आर्वीचे नाना पहेलवान व ग्रामस्थ करीत असतात. ह्या कुस्त्यांसाठी मध्यप्रदेश, हरियाना या राज्यातून तसेच महाराष्ट्रातील परंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, नंदूरबार, जळगांव, नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातून पहेलवान (कुस्तीगीर) कुस्त्यांसाठी आलेले होते. सदर कुस्तींचा सामना बघण्यासाठी धुळे जिल्ह्यासह आर्वी पंचक्रोषीतील चाहत्यांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केलेली होती. याप्रसंगी भाजपचे विधानसभा प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे यांनी उपस्थितीत कुस्तीविरांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करतांना म्हणाले, हा खेळ फार पूर्र्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा खेळ दोघांमध्ये जातो. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. नियमीत कुस्ती खेळून वा व्यायाम करुन एखादा जगज्जेदा होईलच असे नसले तरी हा खेळ व्यायाम म्हणून खेळला तर यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो व कॉलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. म्हणून या मैदानी खेळाचे फार महत्व आहे. कुस्तीचा हा खेळ आरोग्य निरामय ठेवण्यासाठी कुस्तीचा नियमीत सराव करावा असे त्यांनी यावेळी उपस्थितांन सांगितले. तसेच या मातीतील खेळाचे प्रबोधन करुन याची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्नशील रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या शिव सोमनाथ यात्रा उत्सवानिमीत्त रंगलेल्या कुस्तींच्या सामन्यात पंढरपूर व मालेगांव च्या कुस्तीविरांध्ये लागलेली कुस्तीकडे सर्व कुस्ती चाहत्यांचे आकर्षन लागले होते त्या कुस्तीत मालेगांव येथील कुस्तीविर विजेता ठरला. या कार्यक्रमाप्रसंगी जि.प.सदस्य किशोर हालोर, पं.स.सदस्य जिभाऊ शेणगे, माजी सरपंच नामदेव चौधरी,एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, ग्रा.पं.सदस्य रोहिदास तलवारे,नाना खैरनार, माजी पं.स.सदस्य विश्वनाथ सोनवणे, धाडऱ्याचे माजी पं.स.सदस्य मुन्ना पवार, सोनेवाडीचे सरपंच सुभाष महाराज, मोघणचे अंकुशभाऊ सोनवणे यांच्या आर्वी व पंचक्रोषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post