डॉ.सुभाषजी भामरे विजयाची हॅट्रिक साधनार धुळे तालुका देणार भरघोस मताधिक्य- रामदादा भदाणे धुळे दि.२४ - देशाचे प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधान मंत्रीची शपथ घेतील. यांच्या सोबत धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे हे देखील विजयाची हॅट्रिक पताका फळकवणार आहेत. यासाठी धुळे तालुक्यातून भरघोस मताधिक्य देणार असल्याचा विश्वास भाजपचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि प सदस्य रामदादा भदाणे यांनी डॉ. सुभाषजी भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना दिला आहे. लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबासो.डॉ. सुभाषजी भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील वडजाई, सौंदाणे व बाभूळवाडी येथे प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. मागील 10 वर्षात बाबासाहेबांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडण्यात आला. दरम्यान रामदादा भदाणे यांनी मतदारांशी चर्चा केली. डॉ. सुभाषजी भामरे यांची विकास कामे लोकहिताचे आहेत याची माहिती दिली. धुळे ग्रामीणसाठी डॉ. सुभाषजी भामरे यांनी पाणी, रस्ते, कृषी, आरोग्य, सोबत शिक्षण या महत्वाच्या विषयावर कामे केली आहेत. धुळे ग्रामीण जनतेवर डॉ. सुभाषजी भामरे यांचा विश्वास आहे. या निवडणुकीत आपण या विश्वासाला पात्र ठरू अशी भावनिक साद जनतेने यावेळी दिली आहे. जि प सदस्य रामदादा भदाणे यांनी विश्वास दिला आहे कि, डॉ.सुभाषजी भामरे विजयाची हॅट्रिक साधनार आहेत त्यांना धुळे तालुक्यातून भरघोस मताधिक्य मिळणार आहेत. प्रचार रॅलीचे प्रत्येक गावात जल्लोशाने स्वागत करण्यात आले. या प्रचार भेटी दरम्यान नव मतदार युवकांची मोठी फडी जुळत आहे. डॉ. सुभाषजी भामरे यांच्या १० वर्षाच्या काळात जे विकास कामे केली आहेत ती चिरस्थायी आहेत. त्यांच्या विकास कामामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. येणाऱ्या पुढील काळात अनेक नवीन संकल्पना त्यांच्या विचाराधीन आहेत . त्यात युवकांच्या रोजगारांचा प्रश्न , आरोग्याच्या सुविधा, आधुनिक शेती आणि जलसाठा यावर भर दिला जाणार आहे. म्हणून उत्तम संधी आपल्या हाती मिळाली आहे. याचे सोन करण्याचे आवाहन यावेळी रामदादा भदाणे यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रा.अरविंदजी जाधव सर, श्री.भाऊसाहेब देसले,माजी उपसरपंच श्री.नानाभाऊ पाटील यांच्यासह भाजप चे प्रमुख कार्येकर्ते उपस्थित होते..
byloksahi.varta.news
-
0