-->

कर्मचारी वर्गाकडुन दाखल तक्रार नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कार्यवाही. धुळे - दि. ( गोकुळ देवरे ) - २२ एप्रिल‌ २०२४ रोजी उपअधिक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक , राज्य आपत्ती प्रतिसाद दल , धुळे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा.तकारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल , धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत . दलातील तक्रारदार व त्यांचे सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे १४ व १५ एप्रिल २०२४ रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांचे कडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता . त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी एक हजार रुपये असे एकुण पाच हजार रुपये जमा करुन मला आणुन दे , नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले होते. तकारदार यांनी कर्मचा-यांकडुन पैसे जमा करुन सदरची लाचेची रक्कम पाच हजार रुपये पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती.सदर तकारीची दि.२० एप्रिल २०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजर कर्मचा-यांकडुन एक हजार रुपये याप्रमाणे पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम आज दि.२२ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे एस. आर. पी. कॉलनी , नकाणे रोड , धुळे येथील राहते घरी स्विकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन चंद्रकांत बाबुराव पारसकर , सहायक समादेशक. राज्य आपत्ती प्रतिसाद दल , धुळे यांचे विरुध्द पश्चिम देवपुर पो.स्टे. जि.धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री.अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी , तसेच राजन कदम , मुकेश अहिरे , प्रशांत बागुल , संतोष पावरा , रामदास बारेला , प्रविण पाटील , मकरंद पाटील , प्रविण मोरे , सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे . सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post