-->

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा इफ्तारी कार्यक्रमाचे आयोजन धुळे दि. ०५ (गोकुळ देवरे) - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा इफ्तारी कार्यक्रमाचे आयोजन करून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गाव पातळी पासून देश पातळी पर्यंत सामाजिक ऐत्याची भूमिका वाढीस लागेल असा आशावाद मुस्लिम बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. धुळ्यातील वीर सावरकर मार्ग वरील दैनिक आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात मुस्लिम समाजाच्या पत्रकारांसाठी रोजा ईफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार तवाब अन्सारी यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्व विशद केले .त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात येणाऱ्या रोजा उपवासाचे महत्त्व देखील सांगितले.सर्वधर्मसमभाव जपून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश पत्रकार संघाने दिला आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकता मजबूत होण्यास मदत मिळेल. त्याच प्रमाणे या देशाला हिंदू मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेच्या माध्यमातूनच दोन्ही समाजाच्या वतीने सामाजिक सलोखा राखण्याची काम होणे अपेक्षित आहे. हाच पायंडा पत्रकार संघाच्या वतीने जपण्यात आला. ही बाब कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी उर्दू दैनिकाच्या पत्रकारांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या वतीने प्रांतिक प्रतिनिधी जसपाल सिंग सिसोदिया यांनी देखील सामाजिक ऐक्याचे महत्त्व विशद केले या देशाला मजबूत करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या समुदायाचा हातभार महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपलाच पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाप्रसंगी तर माजी अध्यक्ष हेमंत मदने यांनी धुळे जिल्ह्यात असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा मोठी असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे,सचिव डी.बी.पाटील,खजिनदार सुवर्णा टेंबेकर,रेहान शेख,तवाब अन्सारी,सलिम अन्सारी,पप्पू सोनी,रहेमान मलिक,रियाज अहमद,सैफुर रहेमान,अब्दुलहक काजी,अब्दुल रशीद,तालुका संघाचे अध्यक्ष रोहीदास हाके,मनोज बैसाणे,शोभा आखाडे, सुनील निकम, पवन मराठे, जाँनी पवार, सुनील पाटील, मेनुयल मकासरे, कैलास गर्दे, सोपान देसले, निलेश परदेशी, दत्ता बागुल,विजय पाठक,दिनेश विभाडीक,गोकुळ देवरे,बापु अहिरे,सिद्धार्थ मोरे,श्री.टेंबेकर, दुयौधन पाटील अदीसह संचालक, पत्रकार बांधव उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post