शिंदखेडा (वाघाडी बु.) दि.३१ - (सुरेश पाटील) देश की बात फाउंडेशन तर्फे शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रुक येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले व भारतीय जनता पार्टीच्या निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित देश की बात फाउंडेशन चे डिस्ट्रिक कॉर्डिनेटर अँड. संदीप पाटील उपस्थित बाभळे गावातील लोकनियुक्त मा. सरपंच ज्ञानेश्वर पाटील, अनिल पवार, ईश्वर पाटील, सुरेश पाटील, योगेश ठाकूर ,योगेश पवार,नितीन पाटील, भगत राजू भिल, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संदीप पाटील , ज्ञानेश्वर पाटील , ईश्वर पाटील , अनिल पवार यांनी सांगितले की देशात विरोधी पक्ष संपवण्याचे काम चालू असून नागरिकांचे मूलभूत सुविधांवरती सरकार लक्ष देत नाही आहे ईडि व सीबीआयचा धाक दाखवण्यात येत असून विरोधकांना जरी तुरुंगात टाकण्याचे काम सुरू आहे तसेच विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही येणाऱ्या निवडणुकीत नागरिक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post