एकविरा मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एकविरा देवी मंदीर परिसरात विनामुल्य वाहन पार्किंग सोय करण्यात आली आहे धुळे दि. २६ - एकविरा मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एकविरा देवी मंदीर परिसरात विनामुल्य वाहन पार्किंग सोय करण्यात आली आहे माहिती बाबत......देवपुर पोलीस ठाणे आणि धुळे पोलीस दला तर्फे असे जाहीर करण्यात येते की, आज दिनांक २२/०४/२०२४ रोजी पासुन एकविरा देवी यात्रा उत्सव सुरु झालेला आहे खान्देश परिसर व गुजरात, मध्यप्रदेश राज्यातुन मोठ्या प्रमाणात भाविक हे एकविरा मातेचे दर्शनासाठी व नवसफेडण्यासाठी एकविरा देवी मंदीर परिसरात एकविरा मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एकविरा देवी मंदीर परिसरात विनामुल्य वाहन पार्किंग सोय करण्यात आली आहे चारचाकीं व दुचाकी वाहनातून येत आहेत आमचे असे निदर्शनास आले आहे की, सदर परिसरात राहणारे काही व्यक्ती बाहेरिल वाहनचालक यांचे कडुन वाहन पार्क करण्याचे तसेच वाहन मंदीरापर्यंत सोडण्याचे पैसे मागत आहेत तरी अश्या कोणत्याही व्यक्तीस कोणीही पैसे देवु नये असे कोणी पैसेची मागणी केल्याचे आढळुन आल्यास त्याचा फोटो काढणे व तो पोलीस मदत केंद्र एकविरा माता मंदीर परिसर किंवा देवपुर पोलीस ठाणे येथे दयावे किंवा ११२ या क्रमांकावर फोनकरुन माहिती दयावी किंवा देवपुर पोलीस ठाणे सर्पक क्रमांक ०२५६२- २८८२१९ याक्रमांकावर फोनकरुन तक्रार कळवावी. पोलीसांकडुन किंवा एकविरा मंदीर ट्रस्ट किंवा मनपा धुळे इत्यादी कडुन वाहन पार्किंग व तत्सम गोष्टीकरिता कोणालाही कॉन्ट्रेक्ट ठेका, दिलेला नाही वाहन पार्किंग ची सोय विर सावरकर पुतळा ते मोठा पुल रस्ताचे एका बाजुला तसेच हत्ती डोह ते अमधाम रस्ताचे बाजुला विनामुल्य करण्यात आली आहे भाविकांची कोणी फसवणुक करु नये म्हणुन सदरची बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे.
byloksahi.varta.news
-
0