-->

साक्री दि.५ (अमृतसागर) - राहुल माधव थोरात वय ३० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. बूध्द विहार नगर प्लाट नं १७ साक्री जि.धुळेसमक्ष पोलीस स्टेशनला हजर राहुन फिर्याद लिहुन देतो की, मी वरील ठिकाणी माझे वडील माधव थोरात आइ वंदनाबाइ, पुतण्या स्नविर प्रकाश थोरात, पुतणी दिक्षा प्रकाश थोरात, असे एकत्र राहत असुन मी चालक म्हणुन काम करुन परीवाराचा उदरनिर्वाह करतो, माझा मोठा भाउ प्रकाश हा नोकरी निमित्त बोइसर येथे त्याच्या पत्नी सह राहतो माझा पुतण्या हा गुरुवर्य गोळवलकर प्राथमिक विदया मंदीर टाटीया नगर साक्री येथील येथे इयत्ता ४ थी मध्ये शिकत आहे. पुतण्या रनविर हा साकाळी ०७/०० ते ११/०० वाजेपावेतो शाळेत जात असतो.दिनांक ५/०४/२०२४ रोजी सकाळी ११/०० वाजेचे सुमारास माझा पुतण्या रनविर प्रकाश थोरात यास माझे वडील हे शाळेतुन घरी घेवुन आले तेव्हा आंम्हाला कासारे येथे जायवयाचे असल्याने मी, पुतण्या रनविर यास सांगीतले की, तु शाळेचा ड्रेस बदलवुन घे असे सांगीतले तेव्हा तो, त्याचा शाळेचा ड्रेस बदलवत असतांना त्याची बहीण दिक्षा हिस त्याच्या पाठीवर वळ दिसले तेव्हा तिने मला त्याबाबत सांगीतले असता मी, पुतण्या यास विचारले की, हे वळ कशाचे आहेत तेव्हा त्याने मला सांगीतले की, मला सकाळी ०९/०० वाजेचे सुमारास आमच्या शाळेतील मॅडम निलाक्षी नांद्रे यांनी मला भागाकार आला नाही यामुळे मला लाकडी गोल काठीने माझया पाठीवर मारहाण केली असे सांगीतल्याने मी, माझा पुतण्या रनविर यास दुपारी ०३/०० वाजेसे सुमारास साक्री पोलीस स्टेशन येथे घेवुन आलो त्यांनतर मला पुतण्या रनविर यास उपचाराकामी मेमो दिल्याने मी,पुतण्या रनविर याच्यावर उपचार करुन पोलीस स्टेशनला आलो आहे तरी गुरुवर्य गोळवलकर प्राथमिक विदया मंदीर टाटीया नगर साक्री येथील शिक्षीका निलाक्षी नांद्रे यांचे विरुदध तक्रार आहे.तरी दिनांक ५/०४/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वाजेच्या सुमारास पुतण्या रनविर हा गुरुवर्य गोळवलकर प्राथमिक विदया मंदीर टाटीया नगर साक्री येथील शाळेत असतांना त्यास भागाकार आला नाही म्हणुन वर्ग शिक्षीका निलाक्षी नांद्रे रा.साक्री पुर्ण नाव माहीत यांनी त्यांच्या हातातील गोल काठीणे पुतण्या याच्या पाठीवर, हातावर, पोटावर, कंबरेवर मारुन दुखापती केले म्हणुन माझी वर्ग शिक्षीका निलाक्षी नांद्रे यांच्या विरुदध तक्रार आहे


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post