-->

धुळे दि.१४.(गोकुळ देवरे.) - येथे जागतिक रक्तदान दिन‌निमित्त धुळे व्यापारी महासंघातर्फे समाज उपयोगी महारक्तदान शिबीराचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रेष्ठ दान रक्तदान असून माणसाला या दानाने जीवनदान प्राप्त होते.जगात श्रेष्ठदान म्हणून सर्वांनी रक्तदान करण्याचा संकल्प करावा यानिमित्त व्यापारी बांधवांनी दिला.धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स मध्ये सकाळी नऊ ते पाच दरम्यान धुळे व्यापारी महासंघ धुळेच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तीनशेहून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प धुळे व्यापारी महासंघाचा असून सकाळपासूनच तरूणांनी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या ठिकाणी भव्य रक्तदान सहभाग नोंदविला.तसेच या रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील चाळीस व्यापारी संघटनांनी सहभाग नोंदवत या भव्य रक्तदान शिबिराला हातभार लावत यावेळी शिबिराचे उद्घाटन धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र आणि बॅग व हेडफोन भेट म्हणून वस्तू देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग,प्रविण लुल्ला,प्रशांत देवरे,सुभाष कोटेच्या,अजय नाशिककर,राजेश गिंदोडिया, महेंद्र सोनार,सुरज शर्मा,मनीष उपाध्याय,पवन कटारिया,अशोक डियालानी व्यापारी पदाधिकारी व्यापारी वर्ग धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post