-->

वाटर योगा मुळे दुर्धर व्याधी हमखास ब-या होतात.लाभार्थीनी सांगितलेत अनुभव.! धुळे दि.१८. (गोकुळ देवरे) - धुळे वाटर योगाची साधना ही दुर्धर व्याधी वरील उत्तम औषधी असल्याचा अनुभवत वाटर योगाच्या साधनेत सहभाग घेतलेल्या लाभार्थींनी बोलून दाखविला.विश्व योगा दिवसाचे औचित्य साधुन आजदि.१८ रोजी सकाळी सहा वाजता जिल्हा क्रिडा संकुलातील जल तरण तलावात,योग गुरु डॉ.जगदिश गिंदोडिया यांच्या अधिपत्याखाली वाटर योगाचे सत्र संपन्न झाले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्ता देगावकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र सोनावणे,दिनेश गिंदोडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत‌ संपन्न झालेल्या या प्रशिक्षण सत्रात अडीच वर्षांच्या साधका पासून तर पंच्यांयशी वर्षाच्या साधकांनी सहभाग घेतला होता.अनेक प्रकार योगाचे घेतले सुर्य नमस्कार,पद्मासन, शिर्शासन,मक्रासन,गरुडासन,हनुमान उडी आदिंची प्रात्यक्षिके योग साधकांनी करुन दाखविलीत सुरवातीला वाटर योगा ग्रुपचे मार्गदर्शक महेशबाबा घुगे वयांनी जागतिक योगा दिनाचे निमित्त साधुन वाटर योगा सत्र आयोजित करण्यात मागची पार्श्वभूमी सांगितली.व शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती साठी वाटर योगाचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.कुठल्या व्याधी साठी कुठला वाटर योगा करावाया संदर्भात यांची माहिती या वेळी योग गुरु डॉ जगदिश गिंदोडिया यांनी दिली.माणसाला सर्वार्थाने तंदुरुस्त ठेवण्यासाठी वाटरयोगा या पर्याया बद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर,समाधान व्यक्त करीत वाक्य योगा ग्रुपला शुभेच्छा प्रदान केल्यात.शेवटी वाटर योगा साधक एच.ओ.पाटील यांनी आभार मानलेत.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post