धुळे तालुक्यातील रामनगर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून प्रारंभ करण्यात आला. धुळे दि. १७ (गोकुळ देवरे) - शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १५.जुन२०२४ रोजी विद्यार्थ्यांनां शिक्षक मनोहर पाटील यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले.वाढत चाललेली ऊष्णता पाण्याची कमतरता अश्या घटकांचे महत्त्व समजावून दिले.वृक्षारोपण का करावे या बाबतीत माहिती तसेच स्वच्छता का जोपासली जावी म्हणून सांगितले आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात. शाळेत वड व पिंपळ इ. वृक्षांची रोपे दोन बाय दोनचा खड्डे खोदून लावण्यात आली. या वेळी श्री. खैरनार गुरूजी व गोकूळ देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रोपांच्या संरक्षणासाठी काटेरी साबरचे कुंपण करण्यात आले. सुत्रओल ठाकरे, अर्जुन सोनवणे, कृष्णा सोनवणे, राज सोनवणे, रोशनी ठाकरे, मनीषा भील विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.
byloksahi.varta.news
-
0