महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एम. एन. जी. एल.) (गेल इंडिया लि. व बी.पी.सी.एल यांचा संयुक्त प्रकल्प) सी.एस.आर. सहाय्यता निधी अंतर्गत..भारत विकास परिषद - धुळे शाखा आणि विकलांग केंद्र -पुणे आयोजित मोफत दिव्यांग शिबिर. धुळे.दि.२२ (गोकुळ देवरे) - भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरु आहे.रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांगता मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एम.एन.जी.एल.) (गेल इंडिया लि. व बी.पी.सी.एल यांचा संयुक्त प्रकल्प) यांच्या सी.एस.आर. सहाय्यता निधी अंतर्गत दिव्यांगांना मोफत कृत्रिम अत्याधुनिक अवयव प्रदान करण्यासाठी धुळे येथे दिनांक २१ जुलै २०२४ रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत भारत विकास परिषद-धुळे शाखेचे अध्यक्ष श्री. राजेश वाणी यांनी स्वागतपर प्रस्तावना केली.विकलांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि अत्याधुनिक मोडयूलर पायविषयी माहिती दिली.माहिती देताना ते म्हणाले अत्याधुनिक मॉड्युलर पायाची कमर्शियल किमंत रु.५० हजारापेक्षा जास्त व कृत्रिम कमर्शियल हाताची किमंत २५ हजारापर्यंत आहे. असे कृत्रिम अवयव ह्या शिबिरात २०० दिव्यांगांना देणार आहोत भारत विकास परिषदेकडून ही सेवा मोफत देण्यात येते. विकलांग पुनर्वसन केंद्राला कोणतीही सरकारी मदत नसल्याने कागदपत्रात न अडकता,कोणतेही निकष न लावता सर्व दिव्यांगांना ही मोफत सेवा दिली जाते.समाजासाठी चालविण्यात येणारा हा सेवा यज्ञ आहे.या सेवा यज्ञात महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.(एम.एन.जी.एल.) आता सहभागी झाली असून अन्य इतर कंपन्यांचे / संस्थांचे आर्थिक सहकार्य संस्थेला मिळत असते.भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यांच्यात राष्ट्रभाव,राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी संस्था आहे. सद्यस्थितीत विविध राज्यात मिळून संस्थेची कायमस्वरूपी १३ विकलांग केंद्र आहेत.भारतातील १३ केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी विकलांग केंद्र,पुणे येथे १९९८ पासून कार्यरत असून दरवर्षी सुमारे ३ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय,हात,व कॅलिपर बसविण्यात येतात.केंद्रातील वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री व प्रशिक्षित तज्ञांच्या द्वारे सर्व कृत्रिम अवयव बनविले जातात.पाय बसविल्यानंतर अपंग व्यक्ती चालणे,पळणे, पोहोणे,उडी मारणे, वाहन चालविणे,इ.प्रकारची दैनदिन क्रिया करू शकतात.त्याबाबत केंद्रावर तज्ञांमार्फत सराव / मार्गदर्शनही केले जाते.श्री. विनयजी खटावकर यांनी ह्या प्रसंगी धुळे दिव्यांग शिबीर नियोजन समितीची घोषणा केली. ह्या समिति मधे धुळे शाखेचे अध्यक्ष श्री.राजेश वाणी आणि सेक्रेटरी श्री.अजय कासोदेकर यांच्यासह खालील सदस्यांचा समावेश असेल श्री.महेंद्र विसपुते.श्री.मोहनलाल चित्ते.श्री.विजयसिंग सिसोदिया.श्री.विलास कोठावदे.श्री धनंजय शुक्ल.श्री.रामलाल जैन.भारत विकास परिषद-धुळे शाखेचे सेक्रेटरी श्री अजय कासोदेकर यांनी आभार प्रदर्शन केले.शिबीर डॉ.संजय खोपडे यांचे लोकमान्य हॉस्पिटल चाळीसगाव रोड,धुळे दि.२१जुलै रविवार.२०२४ रोजी.सकाळी ९ते २.००.नोंदणीसाठी संपर्क श्री.अनिरुद्ध पाटणकर. ९५४५५०४९६४,श्री.राजेंद्र पाध्ये.९५५२६१८९००पूर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.प्रथम नोंदणीला प्राधान्य असल्याने दिव्यांगांनी त्वरित नोंदणी करावी ही विनंती याबाबत गरजूंनी संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post