-->

धुळे दि.२१ (गोकुळ देवरे) - धुळे वटपौर्णिमे निमित्त पर्यावरण मित्रमैत्रिणी कडुन झाडांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पर्यावरण मित्रमैत्रिणी यांनी वलवाडी परिसरात चार वर्षांपासून वृक्ष लागवड ,संवर्धन उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.यात वटपौर्णिमा निमित्त वडाची रोपे महिलांना पुजा व योग्य त्या ठिकाणी लागवडीसाठी उपलब्ध करून दिली जातात.पहिला उपक्रम धुळे शहराजवळ मोहाडी उपनगर येथील महिलानां वडाचे सौ.पगार मॅडम यांना २०१६ या वर्षी वटपौर्णिमा निमित्त उपलब्ध करून दिले होते.आज तो मोठा वटवृक्ष झाला आहे.तसेच ग्रामीण भागात सावळदे येथे आणि शहरातील वलवाडी परिसरात विद्युत प्रभा काॅलनी येथे शिक्षीका सौ.वैशाली बि-हाडे कोळी यांना २०२०या वर्षी उपलब्ध करून दिले होते आज वृक्षात रूपांतर झाले आहे.तसेच२०२२ या वर्षी वरील वृक्षाचा वाढदिवस व नविन रोपांची लागवड केली होती आज दि.२१जुन रोजी वटपौर्णिमा औचित्य साधून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी लहान बालका प्रमाणे केक वाढवून विधीवत वृक्षांची पुजा करण्यात आली महिला भगिनींनी यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून या सणाचा आनंद घेत नविन बालवट वृक्षांची रोपे देवून पुढील वर्षी वाढदिवस साजरा करण्यात यावा म्हणून पर्यावरणपुरक वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करण्याचे कार्य केले.यावेळी मा.नगरसेविका वंदना भामरे ,प्रा.डॉ.ममता सोनवणे,संगिता संन्याशीसरला गोकुळ देवरे,वनमाला ठाकरे,भाग्यश्री महाले,संगीता पाटील,भूषण पाटील, उपस्थित होते.वडाची वीस रोपे महिलांना देण्यात आली मोरदड.ता.धुळे. येथील ग्रामसेवक यांनी सरपंच विनायक पाटील व महिला सदस्य यांच्या मागणी वडाची रोपे पुरविण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण मित्र गोकूळ देवरे यांनी केले‌ तर सूत्रसंचालन प्रा.डाॅ.ममता सैनवणे यांनी केले.सरला देवरे यांनी आभार मानले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post