गंगामाई डी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश नगांव दि.०३ - नगांव-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा औषधनिर्माणशास्त्र (डी फार्मसी) शाखेचा निकाल नुकताच ज़ाहिर झाला. गंगामाई इन्स्टीट्यूट ऑफ फार्मेसी (डी फार्मसी ) नगांवच्या विद्यार्थ्यांनी ही परंपरा कायम राखली असुन महाविद्यालयाचे नाव लौकीक केले. द्वितीय वर्षात सोनवणे अजय हिरालाल ८१.०९ % गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, माळी निलेश धर्मदास ७८.३६% गुण मिळवून द्वितीय तर देसले भावना विजय ७७.१८% गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम वर्षात शेवाळे निखिल रविंद्र ७५.८० % गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, सोनवणे गायत्री श्याम ७१.९०% गुण मिळवून द्वितीय तर जाधव भूषण दीपक ७१.६०% गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. या महाविद्यालया मध्ये डी फार्मसी अभ्यासक्रमा करीता लागणारी प्रशस्त इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, व मार्गदर्शन शिबीर, औषध कंपनीस भेट, हॉस्पिटल भेट तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष शैक्षणिक प्रगति करुन घेण्याच्या दृष्टिकोनातुन महाविद्यालय कार्यरत असल्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव मनोहर भदाणे, उपाध्यक्षा सौ. ज्ञानज्योती भदाणे, अध्यक्ष राघवेंद्र भदाणे तसेच प्राचार्य एस.व्ही. चोरड़िया यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच या करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ही योगदान महत्वाचे होते.
byloksahi.varta.news
-
0