शिंदखेडा तालुक्यात भाजपाला खिंडार कामराज भाऊसाहेबसह पदाधिकारी वाजवणार तुतारी... धुळे दि.१९(गोकुळ देवरे) - शिंदखेडा तालुक्यातील भाजपा जेष्ठ नेते विखरण गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे कामराज निकम यांनी बंडखोरी केल्याने मागील दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चा जोरदार तालुक्यात सुरू होती.अखेर प्रवेशाला तारीख मिळाल्याने उद्या दि.२०जुलै २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज भाऊसाहेब यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत कामराज भाऊसाहेब यांनी दिली त्यांच्या सोबत शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक तसेच कामराज भाऊसाहेबांचे खंदेसमर्थक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शामिल होणार आहे. शिंदखेडा तालुक्यातून दोनशे ते तीनशे वाहने पिंपरी चिंचवडकडे रवाना होणार असल्याचे सांगितले. ३२ वर्षांपासून ते भाजपा पक्षाचे एक निष्ठावंत होते. तालुक्यावर नेहमीच अन्याय जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही वरीष्ठ नेतृत्वाने हिरवा कंदील दिला होता. पाणी प्रश्न नेहमी मांडुन सुध्दा सुटला नाही. सुशिक्षीत बेरोजगारीचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. रोजगाराचे उद्योग उभे राहिले नाहीत. अनेक समस्या तालुक्यातील असुन त्या आम्ही निदर्शनास आणूनही मुद्दाम दुर्लक्ष केले. पण आ. रावल यांनी टाळाटाळ केली. या सर्व बाबीचा विचार करून मी हा निर्णय घेत आहे. राष्टवादी पक्ष व नेते खा. शरद पवारसाहेब जी जबाबदारी देतील ती आनंदाने स्विकारण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी या निर्णयाला आलो आहे. यावेळी मंचावर राष्ट्रवादी शरद पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जेष्ठ नेते इंद्रसिंग आण्णा, प्रदेशसचिव संदिप बेडसे महिला जिल्हाध्यक्षा ऊषा पाटील. जि.प. सदस्य ललित वारूळे. पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.तसेच दि.२२.जुलै.२०२४.रोजी प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांचा दौरा असुन तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश सोहळा होणार आहे.
byloksahi.varta.news
-
0