निजामपूर दि.०९(परवेज सैय्यद) - निजामपूर ग्रामपालिका मार्फत आज रोजी नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष सरपंच सौ. शितल गजानन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर शहरात प्रत्येक वार्डात नळपट्टी घरपट्टी वसुली मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमे चे जबाबदार नागरिकांतर्फे स्वागतही करण्यात आले. नळपट्टी घरपट्टी वसुली करण्याची मोहीम प्रथम वार्ड क्रमांक पाच पासून सुरू करण्यात आली यावेळी वार्ड क्र. ५ मधील नागरिक श्री. रहेमान भाई पिंजारी व श्री. कमर भाई शेख व इतर वार्डातील नागरिकांतर्फे चांगलाच प्रतिसाद दिला गेला. निजामपूर ग्रामपंचायत वसुली कर्मचारीसह सरपंच प्रतिनिधी श्री. गजानन शाह हे स्वतः नागरिकांना नळपट्टी घरपट्टी वेळेवर भरण्यास जागृत करून ग्रामपंचायत विषयी निदर्शने व सूचनाही देण्यात आल्या यावेळी वार्ड क्र ५ चे सदस्य मा श्री. रमेश भाऊ कांबळे यांचेही सत्कार करण्यात आले.
byloksahi.varta.news
-
0