-->

भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख राघवेंद्र (राम)पाटीलयांनी केले श्रीगणेशाचे आगमनाचे स्वागत. धुळे दि.09- इडा पिडा जाऊ दे शेतकरी राजाला सुखी राहू दे ही प्रार्थना करत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) पाटील यांनी श्री गणेशाच्या आगमनाचे स्वागत केले. यावेळी परिवारासह मनोभावे श्रीगणेशाचे विधीव्रत पुजन करुन स्थापना करण्यात आली. भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र (पाटील) यांनी आपल्या घरी व नगांव येथील आण्णासाहेब द.वा.पाटील शैक्षणिक संकुलात श्रीगणेशाचे आगमनाचे स्वागत करत मुर्तीची सहपत्नी विधीव्रत स्थापना केली याप्रसंगी जि.प.चे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते बाळासाहेब मनोहर भदाणे, माजी सभापती तथा नगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.ज्ञानज्योतीमाई मनोहर भदाणे, व सौ.वैष्णवीताई भदाणे उपस्थित होत्या.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post