मांजा विरोधात निजामपुर पोलीसांची धडक कारवाई, २ गुन्हे दाखल. निजामपूर (परवेज सैय्यद) दि.१५ - मांजा विरोधात निजामपुर पोलीसांची धडक कारवाई, २ गुन्हे दाखल.आगामी मगर संक्रांतीचे दिवसांत पंतग उडविण्या करीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणा-यांवर दिनांक १३ डिसेंबर रोजी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत निजामपुर येथील दुकानदार नामे हितेश शशिकांत शहा यांचे मेन रोड निजामपुर येथील व नामे किरण पंढरीनाथ चौधरी यांचे पाताळनगरी निजामपुर येथील दुकानात तपासणी केले असता पंतग उडविण्या करीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करताना मिळुन आल्याने पोकों/ ५०८ कृष्णा अशोक भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन-३४३/२०२४ पर्यावरण कायदा १९८६ चे कलम ५,१५ सह भा. न्या. सं. का. - २०२३ चे क. २२३ प्रमाणे गुन्हा दाखल तसेच पो.कॉ./४५९टिलु नायका पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन- ३४४/२०२४ पर्यावरण कायदा १९८६ चे कलम ५,१५सह भा.न्या.सं.का.-२०२३ चे क. २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यातील आरोपी अनुक्रमे १) नामे किरण पंढरीनाथ चौधरी वय-४० वर्षे रा.पातळनगरी निजामपुर ता. साक्री २) नामे हितेश शशिकांत शहा वय - ४९ रा. मेन रोड निजामपुर ता. साक्री त्यांचेदुकानतुन एकुण-३२९०/- रुपयेचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मयुर एस. भामरे यांनी निजामपुर / जैताणे तसेच माळमाथा परिसरातील सर्वपतंग विक्रेते व दुकानदार यांना आव्हाहन केले आहे की, आपले दुकानात शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करता ठेऊ नये त्यामुळे अनेक व्यक्तींना आपला जिव गमवावा लागतो तरी आपण नियमांचे पालन करावे.सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे. मा. किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे,मा. एस. आर. वांवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, यांचे मार्गदर्शना खाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि / श्री.मयुर एस. भामरे, पोउपनी / प्रदीप पंडीत सोनवणे, पोहेकॉ / १२५४ नारायण माळचे, पोहेकॉ / ४१० आर. यु. मोरे, पोहेकॉ / १३६१प्रदीपकुमार आखाडे, पोकॉ/४५९ टिलु नायका, पो.कॉ./५०८ कृष्णा अशोक भिल, पो.कॉ./ १२५३ पृथ्वीराज शिंदे, पो.कॉ ./ २८४ सुनिल अहिरे, यांचे पथकाने केली आहे.
byloksahi.varta.news
-
0