मोटार सायकल चोर अटकेत, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई निजामपूर (परवेज सैय्यद) दि.१६ रोजी मध्य रात्री निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील निजामपुर गावातील मेन रोड येथे राहणारे श्री. प्रवीण एकनाथ वाणी यांचे घरा समोरुन त्यांचे मालकीची एम. एच. १८बी. यु. ५३९९ हिरो स्प्लेंडर प्लस ६०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल चोरीस गेली होती त्याबाबत श्री.प्रवीण एकनाथ वाणी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीता विरुध्द गुरनं ३५१ / २०२४ बी.एन.एस. कलम ३०३ ( २ ) प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयात कोणताही सबळ पुरावा नसताना गुप्त बातमीव्दारे, सी.सी.टी.व्ही. फुटेज व साक्षीदारां कडे केलेल्या तपासावरुन आरोपी नामे रविंद्र मगन पाटील वय २७ वर्षे रा. असाने ता. साक्री जि. धुळे यास गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरीस गेलेली एकुण ६०,०००/- रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर उपविभागीय पोलीस अधिकारी स.पो.नि. / श्री.पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे,अधिकारी, साक्री, यांचे मार्गदर्शना खाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी मयुर भामरे, पो.उ.नि. / प्रदिप सोनवणे, पो.हे.कॉ./१२५४ एन. पी.माळचे, पो.हे.कॉ. / ४१० रतन मोरे, पोना / १९९ खंडेराव पवार, पो.का. / ४५९ टिलु पावरा, पो.कॉ./५६२ मुकेश दुरगुडे, पो.कॉ./५०८ कृष्णा भिल, पो.कॉ. / २८४ सुनिल अहिरे, चा.पो.कॉ./७८२ माळी यांचे पथकाने केली आहे.
byloksahi.varta.news
-
0