-->

धनूर येथील प्रविण पाटीव व राहूल पाटील सह धुळे ग्रामिण चे आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा भदाणे यांच्या सह विश्वास आणि समर्पणाचा महत्त्वपूर्ण एक क्षण धनूर (प्रविण पाटील) दि.२९.- धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील राघवेद्र उर्फ रामदादा भदाणे यांच्या विजयासाठी धनूर गावतील श्री. प्रवीण पाटील आणि माजी उपसरपंच श्री.राहुल पाटील यांनी धनूर ते म्हसदी येथील धनदाई माता मंदिरा पर्यंतचे अंतर अंन्दाजेे ६० ते ७० किलो मिटर पायी चालत पूर्ण करण्याची मानता मानली होती. ही मानता त्यांनी पूर्ण केली, आणि धुळे ग्रामिण चे आमदार राघवेद्र उर्फ रामदादा भदाणे यांनी धनूर गावाचे प्रविण पाटील व राहूल पाटील सह पायी मानतास निघालेले सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले . तसेच या पवित्र प्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षण व शासकीय सदस्य सौ. माधुरी पाटील, सौ. सीमाताई शरद पाटील, सौ. कमलबाई पाटील, कु. रोहीणी पाटील, कु. जान्हवी पाटील यांची उपस्थिती लाभली.तुमच्या या समर्पणाने माझ्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला.समाजातील असेच विश्वासाचे नाते कायम टिकून राहो, हीच धनदाई मातेला प्रार्थना आपला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. असे धुळे ग्रामिण चे आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा भदाणे म्हणाले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post