-->

परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा शिंदखेडा (राहूल पाटोळे) दि.२९ - परभणी येथील सोमनाथ सुर्यवशी यांची हत्या करणाऱ्या दोषींवर कारवाई करून कडक शिक्षा व्हावी, कुटुंबाला पाच कोटींची आर्थिक मदत व सदस्यांना नोकरी दयावी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा त्वरित राजीनामा घेऊन जाहीर माफी मागावी या सह दलित आदिवासी, मुस्लिम व इतर सर्व सामान्य जनतेवर सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचार निषेधार्थ शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिंदखेडा तहसील कार्यालयावर सकाळी अकरा वाजता निषेध धडक मोर्चा काढण्यात आला धडक मोर्चास सुरवात झाली तत्पूर्वी देशाचे माजी पंतप्रधान तथा अर्थमंत्री मनमोहन सिंह यांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पासून हा मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौफुली, स्टेशन रोड, भगवा चौक, मुख्य रस्ता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे मोर्चाचा समारोप सभा घेऊन अनेकांनी संबोधितकेले. त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी, भिल समाज विकास मंच, मुस्लिम समाज शिंदखेडा यांनी सामूहिक रित्या केले होते. शिंदखेडा शहरासह तालुक्यातील समस्त डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज व सर्व पक्षीय संविधान प्रेमीनी सहभागी झालेहोते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे व भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, सुनिल सोनवणे, मुस्लिम समाजाचे विक्की खाटीक, इकबाल तेली, भटक्या विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवशी, तालुकाध्यक्ष सतिष सूर्यवंशी, विजय मोरे, दिनेश मोरे, अरविंदकुमार मंगासे, रामभाऊ माणिक, सह पदाधिकारी व कार्यकर्ते महिला हजारोच्या संख्येने सहभागी होवुन मोर्चा यशस्वी केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, गोपणीय अनंत पवार यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post