म्हसाई माता महिला पतसंस्था निजामपुर तर्फे तिळगुळ वाटप व हळदकुंकू कार्यक्रम संपन्न. निजामपुर (परवेज सैय्यद) दि.२८ - साक्री तालुक्यातील अग्रेसर आणि राज्यस्तरीय प्रथम पतसंस्था पुरस्कार प्राप्त, स्थापनेपासुन १००% संगणकीकरण वशुन्य टक्के थकवाकी असणारी निजामपुर येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेच्या वतीने महीला सभासदांसाठी सतत २१ वर्षापासुन होतअसलेला मकरसंक्रांत सणानिमित्त हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम दि २३ जानेवारी २०२५ रोजी म्हसाई माता महीला पतसंस्थेच्याप्रशासकीय ईमारत निजामपुर येथे दुपारी ४.00 वाजता साजरा करण्यात आला.पतसंस्थेच्या या दरवर्षी होणा-या हळदीकुंकू समारंभ व तिळगुळ पाटप समारंभासाठी मोठया संख्येने उपस्थित राहणा-यामहीलांचे पतसंस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी स्वागत केले. उपस्थित सभासदांना हळदीकुंकू, तिळगुळ व आकर्षक भेटवस्तु वाटपकरण्यात आले. या कार्यक्रमातुन महीला सभासदांची भेट होत असते व मने जुळत असतात.कार्यक्रमात संस्थेचे शाखा चेअरमन सौ योगिता शाह यांनी सांगितले की, आपली संस्था आर्थिक व्यवहार पहातेच पणसामाजीक ऋण सुदधा फेडण्याचा प्रयत्न करते. आपल्या संस्थेमार्फत दरवर्षी सभासदांचा हळदकुंकवाचा कार्यक्रम, आरोग्यतपासणी,शेक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील सभासद व विदयार्थ्याचा सत्कार सभांरभ धार्मिक स्थळाला देणगी, गुणवंत विदयार्थी सत्कार, वृक्षारोपणअसे विविध उपक्रम राबवुन संस्था सामाजीक बाधीलकी जोपासत असते.उपस्थित महीलांना चहा पान देण्यात आले. यावेळी सभासदांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. सदर कार्यक्रमाला व्हा चेअरपर्सनसौ. वंदनावेन शाह, सौ. योगिता शाह, सौ. संगिता जयस्वाल, श्रीमती स्नेहल राणे, सौ. शैलेजा सोंजे, सौ. राजश्री शाह, सौ आशावाई सुर्यवंशी, सौ. मिराबाई मोहने,सौ माया शाह, सौ. वर्षा जाधव सल्लागार समितीचे सदस्या सौ. सोनाली शाह, सौ. सविता अमृतकर, सौ. सिमा चिंचोले,सौ. अनितामोरे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री. निलेश जयस्वाल, कॅशियर श्री नारायण मोरे, श्री. क्लार्क किरणवाल्हे,श्री. राहुल भोई, श्री. कैलास मोरे व सहकारी श्री. भारत सुर्यवंशी, राज-दिप जयस्वाल यांनी विशेष परीश्रम घेवुन कार्यक्रम संपन्न झाला.
byloksahi.varta.news
-
0