खाकी ठरली जॅकी साठी देवदूत पोलिसांची अनोखी कामगिरी निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२५ - सदर फोटो मधील इसमाचे नाव जॅकी शर्मा असून तो खापर येथील रहिवासी आहे.सुमारे आठ वर्षापूर्वी त्याचा वाजदरे बारीत गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर सदर अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी पोलीस पोहचून पोलिसांनी कुठल्याही प्रकारे ॲम्बुलन्स अथवा खाजगी गाडीची वाट न पाहता त्यास आपल्या सरकारी गाडीत बसून जैताणे ग्रामीण रुग्णालय येथे उपचारास घेऊन आले होते. मदत करणारे पोलिसांचे अंगावरचे खाकी कपडे हे त्याचा रक्ताने माखलेले होते.त्यावेळेस त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते त्यावेळचे तत्कालीन एपीआय खेडकर साहेब यांनी त्यास पैशाने मदत केली होती. तसेच त्यास रक्त लागत असल्याने निजामपूर पोलिसांनी त्यास हिम्मत देत सांगितले होते की. तुला ज्या वेळेस रक्त लागेल त्यावेळेस आम्ही पोलीस तुला रक्तपुरवठा करू तु हिमंत हारू नको.जॅकी यास अपघातात 102 टाके पडलेले असून तो आज पोलिसांमुळे जिवंत आहे असे त्याने निजामपूर पोलिसांना बोलून दाखवले व निजामपूर पोलीस स्टेशन समोर पटांगणात तो गुडघ्यावर बसून त्याने पोलीस स्टेशनचे पाय पडत व त्याच्या डोळ्यात अश्रू आणत पोलीस देव असतात असे सांगीतले.
byloksahi.varta.news
-
0